2075 मध्ये कुठे असतील भारत-पाकिस्तान, किती असेल दोघांची अर्थव्यवस्था?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षात संबंध बिघडले आहेत. पण भारत विकासाच्या जोरावर बराच पुढे निघून गेला आहे. पाकिस्तान मात्र कर्जाच्या ओझाखाली चाललाय. त्याला आपली अर्थव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षात कुठे असेल जाणून घ्या.

2075 मध्ये कुठे असतील भारत-पाकिस्तान, किती असेल दोघांची अर्थव्यवस्था?
india vs pakistan
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 10:25 PM

भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या आहे. पण येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने अनेक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि 2050 मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे भारताशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात असलेला भारताचा शेजारी देश पाकिस्तान आज कर्जाच्या खाली दाबला गेला आहे. 2075 मध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर असेल असे म्हटले आहे. पण त्याचा जीडीपीचा आकडा भारताच्या तुलनेत खूपच कमी असेल.

Goldman Sachs ने भविष्यातील जगातील देशांच्या अर्थव्यवस्था कुठे असतील याबाबत एक अहवाल तयार केलाय. ज्यामध्ये दहा वर्षांनी बदलणारे GDP आकडे दाखवण्यात आलेत. आज भारताची अर्थव्यवस्था ही पाकिस्तानच्या तुलनेत नऊ पटीने अधिक आहे. जेव्हा पाकिस्तान सहाव्या स्थानावर येईल तेव्हा भारत चारपटीने अधिक जीडीपी सह दुसऱ्या स्थानावर असेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

2075 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 52.5 ट्रिलियन डॉलर्सची असेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. आज जी 2.8 ट्रिलियन डॉलर आहे. 2020 ते 2075 पर्यंत दर 10 वर्षांनी जीडीपी दोन ते दीड पट वाढण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 2030 पर्यंत त्यात दुप्पट वाढ होईल. हा आकडा 6.6 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. 2030 आणि 2040 दरम्यान, तो पुन्हा दुप्पट होईल आणि देशाचा जीडीपी $ 13.2 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल.

अहवालानुसार, 2040 ते 2075 दरम्यान जीडीपी वाढीचा दर कमी होईल. अहवालानुसार,

  • 2040 पर्यंत अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने वाढेल.
  • 2040 ते 2050 दरम्यान जीडीपी दीड पटीने वाढेल आणि
  • 2040 ते 2050 दरम्यान भारताचा जीडीपी 13.2 वरून 22.2 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल.
  • 2050 ते 2060 दरम्यान $33.2 ट्रिलियनपर्यंत वाढेल
  • 2070 पर्यंत $45.8 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल.
  • पुढील पाच वर्षांत त्यात 1.2 टक्क्यांनी वाढ होईल आणि 2075 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 52.5 ट्रिलियन डॉलर्सची असेल.

Goldmans Sachs च्या अहवालानुसार 2020 मध्ये पाकिस्तानचा GDP 0.3 ट्रिलियन डॉलर होता, जो 2075 पर्यंत 41 पट वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ५१ वर्षांत पाकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. पाकिस्तान टॉप 10, टॉप 20 किंवा टॉप 30 मध्ये कुठेही नाही. 377 अब्ज डॉलरच्या जीडीपीसह ते 41 व्या क्रमांकावर आहे, परंतु तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की ते $12.3 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसह सहाव्या क्रमांकावर येईल.

2020 ते 2075 या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था दर 10 वर्षांनी दुप्पट होईल असा अंदाज अहवालात आहे. 2020 ते 2030 दरम्यान, पाकिस्तानची अर्थव्यवस्था $0.3 ट्रिलियन ते $0.6 ट्रिलियनपर्यंत दुप्पट होईल. पुढील दहा वर्षांत ते दुप्पट होईल आणि $1.6 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल. यानंतर ते 2050 मध्ये 3.3 ट्रिलियन डॉलर, 2060 मध्ये 6.1 ट्रिलियन डॉलर, 2070 मध्ये 9.9 ट्रिलियन डॉलर आणि 2075 मध्ये 12.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.