चीनच्या नाकावर टिचून भारत बनणार UNSC चा सदस्य, पाहा काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य होण्यासाठी भारताने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली आहे. पण अजून त्याला यश आलेले नाही. अनेक देशांनी भारताला स्थायी सदस्य करावे म्हणून पाठिंबा दिला आहे. पण चीन मात्र त्यावर आडकाठी टाकत आहे. एस जयशंकर यांनी याबाबत बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
UNSC membership : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारत अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. इतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. पण चीन यामध्ये आडकाठी घालत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताला निश्चितपणे UNSC चे स्थायी सदस्यत्व मिळेल असे म्हटले आहे. मात्र यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरातमध्य बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रेक्षकांनी याबाबत त्यांना प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले की, संयुक्त राष्ट्राची स्थापना सुमारे 80 वर्षांपूर्वी झाली होती. चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या पाच देशांनी त्यांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जगात ५० देश स्वतंत्र होते. नंतर त्यांची संख्या १९३ झाली.
काय म्हणाले एस जयशंकर
एस जयशंकर म्हणाले की, “परंतु या पाच देशांनी आपले नियंत्रण कायम ठेवले आहे. पण आता बदल करण्यासाठी सांगावे लागतेय ही विचित्र गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटले आहे. काही सहमत आहेत, काही जण प्रामाणिकपणे त्यांचे मत व्यक्त करतात. पण काही देश असे आहेत जे मागून काही गोष्टी करतात.
परराष्ट्रमंत्री म्हणाले की, हे अनेक वर्षांपासून सुरुये. पण आता बदल झाला पाहिजे. भारताला स्थायी सदस्य केले पाहिजे. अशी भावना जगभरात निर्माण झाली आहे. ही भावना वाढतच चालली आहे. आम्ही ते नक्कीच साध्य करू. पण कठोर परिश्रमाशिवाय काहीही साध्य होत नाही. आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.
जगभरात वाढली मागणी
भारत, जपान, जर्मनी आणि इजिप्त या देशांनी मिळून संयुक्त राष्ट्र संघासमोर एक प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आता ही गोष्ट आणखी पुढे जाऊ शकते. परंतु आपण दबाव आणला पाहिजे आणि जेव्हा दबाव वाढतो तेव्हा जगात अशी भावना निर्माण होते की संयुक्त राष्ट्र कमकुवत झाले आहे. युक्रेन युद्धावर संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि गाझावरील हल्ल्यावरुन यूएनमध्ये गोंधळ उडाला होता. एकमत होऊ शकले नाही. मला वाटतं ही भावना जसजशी वाढत जाईल तसतशी आमची स्थायी जागा मिळण्याची शक्यता वाढत जाईल.