-40 से तापमान, 17 हजार फूट उंची; भारतीय जवानांनी अशी पोहोचवली 12000 किलोची तोफ

indian Army Video : भारतीय सैन्याचे जवान किती कठीण परिस्थितीत आपल्या देशाचे रक्षण करतात हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. इतक्या वर कठीण परिस्थितीत जवान राहतात याची कल्पना करणे ही कठीण आहे. भारतीय लष्कराचे जवान 17800 फूट उंचीवर बंकर बांधले आहे.

-40 से तापमान, 17 हजार फूट उंची; भारतीय जवानांनी अशी पोहोचवली 12000 किलोची तोफ
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 8:39 PM

संपूर्ण जग भारतीय लष्कराचा आदर का करतो याचं एक उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कारण ऋतू कोणताही असू दे, परिस्थिती कशीही असो, भारतीय लष्कराचे जवान देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. थंडी असो किंवा घाम गाळणारी उष्णता किंवा आकाशातून बर्फाच्या गोळ्यांचा वर्षाव. भारतीय लष्कराचे जवान सर्व शक्तीने सीमांचे रक्षण करण्यात गुंतलेले असतात. हिवाळी हंगाम सुरू होत असतानाच भारतीय लष्कराने लडाखमध्ये आपलं काम सुरु ठेवले आहे. भारतीय जवानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच भारतीय जवानांना सलाम कराल.

17800 फूट उंचीवर बांधले बंकर

देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी भारतीय लष्कराने हजारो फूट उंचीवर शस्त्र तैनात केली आहेत. एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय जवान लडाखमध्ये 17,800 फूट उंचीवर शस्त्र घेऊन जाताना दिसत आहेत. लडाख सेक्टरमध्ये लष्कराने 12000 किलो वजनाची तोफ एवढ्या उंचीवर नेली आहे. 18,000 फूट उंचीवर एक बंकर बांधण्यात आले आहे. कडाक्याच्या थंडीत देखीलं सैनिक या ठिकाणी उपस्थित राहतील जेणेकरुन शत्रूंवर लक्ष ठेवता येईल. कोणालाही देशाच्या सीमा ओलांडता येणार नाही. एवढ्या उंचीवर श्वास घेणे देखील कठीण असते. पण आमचे सैनिक तिथे उपस्थित राहतील आणि आमचे संरक्षण करणार आहेत.

जगातील सर्वात कठीण भाग

फायर फ्युरी कॉर्प्सच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लष्कराचे जवान दोरीच्या साहाय्याने 17800 फूट उंचीवर शस्त्रे घेऊन जाताना दिसत आहेत. हे काम किती अवघड आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. व्हिडिओ शेअर करताना यासोबत कॅप्शन लिहिले आहे की, ‘जगातील सर्वात कठीण भागात आणि अत्यंत प्रतिकूल हवामानात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या शूर जवानांना सलाम. त्याच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने आव्हानांना विजयांमध्ये रूपांतरित केले जे अशक्य शक्य करते. इतर जगण्यासाठी धडपडत असताना, ते त्यांच्या अविचल भावनेने पुढे जातात.

-40 अंश सेल्सिअसचे धोकादायक हवामान

हा भाग अतिशय कठीण, खडबडीत आणि अत्यंत थंड आहे. भारतीय लष्कराच्या जवानांना -40 अंश सेल्सिअसच्या धोकादायक हवामानात येथे राहावे लागते. सैनिकांना केवळ शारीरिक ताकद नाही तर मानसिक ताकद देखील याठिकाणी गरजेची असते. येथे आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सैनिकांना उंचीवरील युद्धसामग्रीसह सुसज्ज राहावे लागते. येथे इन्सुलेटेड जॅकेट, बूट आणि स्लीपिंग बॅग यांचा समावेश आहे. कठीण परिस्थितीत सैनिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी लष्कराने स्नोमोबाईल्स, स्नो ट्रॅक्टर आणि मोबाईल शेल्टरमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. थंड हवामानासाठी शारीरिक गरजांशी जुळवून घेण्यासाठी अनेक महिने कठोर प्रशिक्षण दिले जाते

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.