India China conflict: भारतीय हद्दीत कोणतेही अतिक्रमण नाही, चीन LAC वर गाव वसावत असल्याचा USAच्या अहवालावर वाद चुकीचा – बिपिन रावत

भारतीय हद्दीत (Indian Territory) येऊन चीन नवीन गाव वसावत असल्याचा जो वाद सुरू आहे तो योग्य नसल्याचं सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांनी सांगितले. ज्या गावाचा उल्लेख करण्यात येत आहे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (Line Of Actual Control) बाहेर आहे आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत मोडतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

India China conflict: भारतीय हद्दीत कोणतेही अतिक्रमण नाही, चीन LAC वर गाव वसावत असल्याचा USAच्या अहवालावर वाद चुकीचा - बिपिन रावत
CDS Bipin Rawat
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 12:20 PM

भारतीय हद्दीत (Indian Territory) येऊन चीन नवीन गाव वसावत असल्याचा जो वाद सुरू आहे तो योग्य नसल्याचं सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांनी सांगितले. ज्या गावाचा उल्लेख करण्यात येत आहे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (Line Of Actual Control) बाहेर आहे आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत मोडतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. चीनने LAC च्या भारतीय अवधारणेचं उल्लंघन केलेले नाही यावर बिपिन रावत यांनी भर दिला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नुकत्याच दिलेल्या एका अहवालात म्हटले की, एलएसीच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये तिबेट स्वायत्त प्रदेश आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील वादग्रस्त भागात चीनने एक मोठे गाव वसवले आहे. त्यानंतर हा वाद सुरू झाला. (Indian Army Bipin Rawat clarifies about US claims about China building village in Indian territory squashes claims over LAC crossing)

चिनने नवीन वसावलेलं गाव- PC PlanetLabs

दरम्यान, अमेरिकेच्या अहवालावर अधिकृत प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने चीनचा आपल्या जमिनीवर केलेला बेकायदेशीर कब्जा किंवा चीनचा केलेला कोणताही दावा मान्य केलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, चीनने सीमेवरील अनेक दशकांपूर्वी बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या भागात, गेल्या अनेक वर्षांमध्ये बांधकामे केली आहेत. भारताने आपल्या जमिनीवरचा असा बेकायदेशीर कब्जा किंवा चीनचा अन्यायकारक दाव्याला कधिही मानियता दिलेली नाही.

LAC वर दोन्ही सैन्याच्या आपापल्या चौक्या आहेत

चिनी लोकांनी भारताच्या भागात येऊन नवीन गाव गाव वसावले आहे हा सध्याचा वाद योग्य नाही. सीडीएस म्हणाले की, मात्र चिनी लोक त्यांच्या नागरिकांसाठी किंवा त्यांच्या सैन्यासाठी एलएसीला लागून जो भाग आहे, तिथे बांधकाम करत आहेत, विशेषत: अलीकडील संघर्षानंतर. बिपिन रावत यांनी असेही सांगितले की LAC वर भारतीय आणि चिनी सैन्याच्या स्वतःच्या चौक्या आहेत.

ते म्हणाले की LAC वर तैनात भारतीय सैनिकांना वर्षातून किमान दोनदा घरी जाण्यासाठी सुट्टी मिळते. चिनी सैनिकांकडे ही सुविधा नाही. तसेच एलएसी पलीकडील क्षेत्रात असलेली तथाकथित गावे ही त्यांच्या सैन्याकरता पायाभूत सुविधा म्हणून निर्माण केली आहेत. त्यांनी भारताच्या एलएसीच्या अवधारणेचं कुठेही उल्लंघन केलेले नाही.

इतर बातम्या-

Salman Khurshid Book Controversy:”हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं”- गुलाम नबी आझाद

UP Elections 2022: निवडणुकीच्या रणनीतीवर उद्या अमित शाह घेणार वाराणसीत बैठक, भाजपचे सर्व 403 विधानसभा प्रभारी राहणार उपस्थित

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.