Udhampur Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 2 पायलट मृत्यूमुखी

या दुर्घटनेत 2 पायलट शहिद झाले आहेत. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपूत अशी शहिद झालेल्या जवानांची नावं आहेत

Udhampur Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 2 पायलट मृत्यूमुखी
मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपूत अशी शहिद झालेल्या जवानांची नावं आहेत
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 5:01 PM

जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) उधमपूर जिल्ह्यात (Udhampur District) भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Crash) झाला आहे. शिवगढ धार भागात (Shivgarh Dhar) ही घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि सैन्याच्या टीम शिवगढ धारकडे रवाना झाल्या आहेत. या दुर्घटनेत 2 पायलट शहिद झाले आहेत. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपूत अशी शहिद झालेल्या जवानांची नावं आहेत. ( Indian Army helicopter crashes in Udhampur, Jammu and Kashmir, 2 pilots Death)

पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात धुकं जास्त होतं, त्यामुळे पुढे काहीही दिसत नव्हतं. शेवटी काहीच न कळाल्याने हेलिकॉप्टरची क्रॅश लॅण्डिंग करावी लागली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार स्थानिकांनी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शिवगढ धारकडे टीम रवाना करण्यात आल्या. शिवधारच्या पटनीचॉप भागात हे हेलिकॉप्टर पडल्याची माहिती आहे. त्यानुसार रेस्क्यु पथक त्या दिशेने रवाना करण्यात आलं आहे.

स्थानिक लोकांना पायलटला हेलिकॉप्टरमधून बाहेर काढलं

सैन्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना शिवगढ धार भागात सकाळी 10 वाजून 30 मिनिटांदरम्यान झाली. त्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्यानंतर स्थानिक लोक मदतीला धावले आणि हेलिकॉप्टरमधून एका पायलटला बाहेर काढलं. हे हेलिकॉप्टर सैन्याच्या एव्हिएशन कोरचं आहे. उत्तरी कमांडच्या संरक्षण प्रवक्त्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अपघात कसा झाला, किती नुकसान झालं यांची माहिती घेतली जात आहे.

जिल्ह्यातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, एक पोलीस पथकही या अतिदुर्गम भागात रवाना करण्यात आलं आहे. तिथं पोहचल्यानंतर त्यांना काहीवेळ लागेल, त्यानंतर अजून माहिती समोर येऊ शकेल. याआधी 3 ऑगस्टला रणजीत सागर डॅममध्ये भारतीय सैन्याचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. हा अपघात सगळी 10.20 मिनिटांनी झाला होता. सैन्याच्या एव्हिएशन स्वार्ड्रनच्या या ध्रुव हेलिकॉप्टरने मामून कँटवरुन उड्डाण केलं होतं. अपघाताआधी हे हेलिकॉप्टर रणजीत सागर धरणाच्या जवळ गस्तीवर होतं. मात्र, त्याचवेळी डोंगराच्या एका सुळक्याला धडकून हे थेट राणजीत सागर धरणात पडलं.

हेही वाचा:

Narendra Giri Death Update : महंत नरेंद्र गिरी आत्महत्येप्रकरणी आता थेट एडिशनल एसपी चौकशीच्या घेऱ्यात, भाजप, सपा नेत्यांचीही चौकशी होणार

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.