नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्करामध्ये दिवाळीनिमित्त सीमेवर गुरुवारी मिठाईची देवाणघेवाण झाली. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) क्रॉसिंग पुलावर भारतीय आणि पाक सैन्यांनी एकमेकांना मिठाईची दिली. दिवाळी, होळी, ईद यांसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर एकमेकांना मिठाईची दिण्याची परंपरा आहे. (Indian army soldiers exchange sweets with Pakistani Bangalesh soldiers on occasion of Diwali festival at international borders)
गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि राजस्थानच्या बारमेर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाक रेंजर्समध्येही मिठाईची देवाणघेवाण झाली.
Punjab: Border Security Force (BSF) and Pakistan Rangers exchange sweets at the Attari-Wagah border on the occasion of #Diwali. pic.twitter.com/nDscZnxbo6
— ANI (@ANI) November 4, 2021
बीएसएफच्या जवानांनी बुधवारी रात्री भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) सोबतपण सण साजरा करण्यासाठी मिठाईची देवाणघेवाण केली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुवाहाटी सीमा रक्षकांनी भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) सोबत मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली ,” गुवाहाटी फ्रंटियर (BSF) च्या अधिकृत हँडलने ट्विट केले.
Today, as a goodwill gesture on the occasion of #Deepawali, IG #BSF #Tripura greeted & exchanged sweets with the counterpart Border Guard #Bangladesh (BGB) on the zero line, at the Integrated Check Post, Agartala, to mark the festival of lights#LongLiveBSF_BGBFriendship#Diwali pic.twitter.com/YMN1mcg2M8
— BSF TRIPURA (@BSF_Tripura) November 4, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल सैनिकांचे कौतुक केले आणि देशाला जवानांचा अभिमान वाटतो, असं म्हणाले. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो तर 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
Other News