चीनला भारतीय सैन्यदल देणार जोरदार प्रत्युत्तर, नियंत्रण रेषा परिसरात डोंगरांवर तैनात होणार ‘जोरावर’ रणगाडे, काय आहे महत्त्व?

सैन्यदलाने जोरावर रणगाड्याचे डिझाईन तयार केले आहे. हे रणगाडे खरेदी करण्याची परवानगीही केंद्र सरकराकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. या रणगाड्यांची खरेडी मेक इन इंडियाच्या प्रक्रियेत आत्मनिर्भर भारत योजनेतून करण्यात येणार आहे. या रणगाड्यांना तयार करण्याचे कंत्राट हे देशातीलच संरक्षण उत्पादने करणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

चीनला भारतीय सैन्यदल देणार जोरदार प्रत्युत्तर, नियंत्रण रेषा परिसरात डोंगरांवर तैनात होणार 'जोरावर' रणगाडे, काय आहे महत्त्व?
चीन सैन्याला नव्या रणगाड्यानवे रोखणारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 3:13 PM

नवी दिल्ली – वजनाने हलके मात्र मार्डन टेक्नॉलॉजी असणारे रणगाडे (Tanks) लवकरच भारतीय सैन्यदलात (Indian Army) समाविष्ट होणार आहेत. जोरावर (Joravar tanks)असे या रणगाड्यांचे नाव आहे. हजारो किलोमीटर अंतरावर, उंच दुर्गम परिसरात असलेल्या पर्वतांवर, कोणत्याही हवामानात शत्रुंवर मात करण्यासाठी या रणगाड्यांचा उपयोग होणार आहे. चीनसोबत उत्तर सीमेवर बिघडलेले संबंध, भविष्यातील आव्हाने आणि लढाया यांचा विचार करता हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून चीनविरोधात पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या संघर्षात, सैन्यदलाकडे असलेल्या रणगाड्यांच्या सहाय्याने चीनला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे. या सगळ्या काळात कमी वजनाच्या मात्र मजबूत आणि अत्याधुनिक रणगाड्यांची कमतरता सातत्याने जाणवत होती. उंचावर असलेल्या दुर्गम भागात हे कमी वजनाचे रणगाडे सहज नेता येते आता यापुढे शक्य होणार आहे.

चीनकडे यापूर्वीच आहेत हलके रणगाडे

दुसरीकडे चीनकडे यासारखे हलके रणगाडे यापूर्वीच चिनी सैन्याकडे आहेत. या रणगाड्यांना एका डोंगरावरुन दुसऱ्या डोंगरावर हलवणे सहज शक्य होणार आहे. हे लक्षात घेता भारतीय सैन्यदलातील ही कमतरता दूर करण्यासाठी योजना आखण्यात आली. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकाचवेळी निर्माण होणारी आव्हाने, भविष्यातील धोके, जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या सैन्य संघर्षावरही सैन्यदलाचे निरीक्षण असून, त्याचेही अध्ययन करण्यात येते आहे. यातून ज्या बाबी समोर येत आहेत, त्या पाहून सैन्यदल भविष्यातील सुरक्षा आव्हाने आणि धोक्यांचा सामना करण्यासाठी दूरगामी रणनीतीचा विचार करीत आहे. तशीच तयारीही करण्यात येते आहे. याच श्रुंखलेत जोरावर रणगाड्यांसह स्वार्म ड्रोन, रणगाडे रोखणारे आणि निर्देशित करु शकणारी मिसाईल्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली युद्धासाठीची वाहने यासारख्या बाबींवर विशेष लक्ष देत आहे.

खरेदी करण्यासाठी सरकारडून हिरवा कंदील

सैन्यदलाने जोरावर रणगाड्याचे डिझाईन तयार केले आहे. हे रणगाडे खरेदी करण्याची परवानगीही केंद्र सरकराकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. या रणगाड्यांची खरेडी मेक इन इंडियाच्या प्रक्रियेत आत्मनिर्भर भारत योजनेतून करण्यात येणार आहे. या रणगाड्यांना तयार करण्याचे कंत्राट हे देशातीलच संरक्षण उत्पादने करणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. सैन्यदलाच्या गरजेप्रमाणे आणि भोगोलिक स्थितीनुसार हे रणगाडे विकसीत करण्यात येणार आहेत. या रणगाड्यात आर्टिफिशल इंटिलिजन्स, ड्रोन संरक्षण प्रणाली आणि धोक्यांची पूर्वसूचना मिळणारे तंत्रज्ञानही असणार आहे.

हे सुद्धा वाचा

जोरावर रणगाडा का महत्त्वाचा?

सैन्यदलासाठी हे रणगाडे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. या रणगाड्यांच्या मदतीने युद्धाची स्थिती बदलली जाऊ शकते, इतके हे रणगाडे भविष्यात महत्त्वाचे ठरतील. शत्रूसोबतच्या युद्धात रणगाडे आणि सैन्याशी मुकाबला करतानाच अदृष्य अशा हवाई आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची प्रणालीही आता गरजेची असल्याचे सांगण्यात येत आहे. ती या जोरावर रणगाड्यांत असेल. वजनाने हलका असलेला हा रणगाडा मजुबतीच्या पातळीवर मात्र सर्वात सक्षम असणार आहे. त्याच्या मारक क्षमतेसमोर शत्रू गुडघे टेकेल. स्वदेशी रणगाड्यांवर भर देण्याचे आणखी एक कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनच्या युद्धात या देशांना रणगाड्यांचे सुटे भाग आणि उपकरणे मिळवण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे जर आपल्याकडे स्वदेशी रणगाडे असतील तर अशा प्रकारच्या समस्या आपल्यासमोर भविष्यात उद्भवू शकणार नाहीत, असाही एक विचार आहे.

कसे पडले जोरावर हे नाव?

जोरावर हे रणगाड्याचे नाव प्राचीन काळातील सेनानायक रोजावर सिंह कहलुरिया यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. त्यांनी लडाख, तिबेट, बाल्टिस्थान आणि स्कर्दू या भागात विजय मिळवला होता. देशातील वेगवेगळ्या अभियानात आणि आपल्या सीमाभागात शत्रू राष्ट्रांकडून वाढत्या ड्रोनच्या वापरानंतर भारत आता अत्याधुनिक ड्रोन हत्यार प्रणाली वाढवण्यावरही भर देत आहे. स्वाम्र ड्रोन प्रणालीचे महत्त्व लक्षात घेता, स्वदेशी कंपन्यांकडून ड्रोन खरेदी करण्यावर भर देण्यात आला आहे. ड्रोनमुळे सैन्यदलाची ताकद वाढली असल्याचे सगळ्यांच्याच लक्षात आलेले आहे. त्यामुळे ड्रोन प्रणालीवरही विशेष भर देण्यात येते आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.