India-China Relations : जागते रहो, LAC जवळ चीनची मोठी तयारी, सॅटलाइट फोटोंमधून धक्कादायक खुलासा
India-China Relations : मोदी सरकारने वेळीच सावध व्हाव. सवयीप्रमाणे दगाबाज चीन केव्हाही पाठित खंजीर खुपसू शकतो. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने या तिन्ही एअर पोर्टवरील घडामोडी महत्वाच्या ठरतात.
नवी दिल्ली : भारतीय भूभागावर अतिक्रमण करणारा चीन सातत्याने आपल्या क्षमतेचा विस्तार करतोय. ड्रॅगन आपल्या सवयीप्रमाणे कधीही दगाफटका करु शकतो. 2020 पासूनच चीनचा नियंत्रण रेषेजवळ एअरफिल्डस म्हणजे विमानतळांचा विस्तार सुरु आहे. चीनने आता आपल्या सैन्यासाठी LAC जवळ मोठी कारवाई करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. LAC जवळ काही भागात भारताला वरचढ होण्याची संधी आहे. त्याचा सामना करण्यासाठी सुद्धा चीनने कंबर कसली आहे.
चीनने घुसखोरी केल्यानंतर प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चित्र मे 2020 पासून बदललय. चीनने एअर फिल्डस, हेलिपॅड. रेल्वे सुविधा, मिसाइल बेस उभारले आहेत. त्याशिवाय रस्ते आणि पूल उभारणीचा काम युद्धपातळीवर सुरु आहे. सैन्याची वेगाने तैनाती करता यावी तसेच खोलवर हल्ला करण्याची चीनची रणनिती आहे.
चीनने LAC जवळ काय-काय केलय?
प्लॅनेट लॅबने सॅटलाइट फोटो उपलब्ध करुन दिलेत. त्यानुसार, होतान, नगरी गुनसा आणि ल्हासा येथे चीनच मोठ विस्तार काम सुरु आहे. नव्या इमारती, धावपट्टी, फायटर जेट्सच्या सुरक्षेसाठी शेल्टर्स आणि लष्करी इमारतींच काम सुरु आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलय.
चीनमधले हे तीन एअरपोर्ट्च का निवडले?
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने या तिन्ही एअर पोर्टवरील घडामोडी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे विश्लेषणासाठी या तिन्ही एअरपोर्ट्सची निवड करण्यात आली. भारत-चीन संबंध मागच्या सहा दशकातील सर्वात खालच्या स्तरावर आहेत. 45 वर्षात पहिल्यांदा असा संघर्ष
2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. भारताने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. चीनचे सुद्धा 30 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. पण चीन कधीही हे मान्य करणार नाही. LAC वर मागच्या 45 वर्षात पहिल्यांदा असा संघर्ष झाला होता. त्यामुळे दगाबाज चीनपासून मोदी सरकारने जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.