रानटीपणाचा गाठला कळस..ओलिसांचं आयुष्य दावणीला..सुटकेच्या आशेवर सहन करताहेत मरणयातना
म्यानमारच्या म्यावाडी भागात 300 पेक्षा जास्त भारतीयांना ओलीस ठेवले आहे, आणि त्यांना आता मरणयातना भोगव्या लागत आहेत.

नवी दिल्लीः म्यानमारमध्ये (Myanmar) ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीयांची अवस्था आता प्रचंड वाईट अवस्था झाली आहे. सध्या म्यानमारमध्ये 300 पेक्षा जास्त भारतीयांना ओलीस (Indian citizen hostage) ठेवले गेले आहे. त्यानंतर भारत सरकारने प्रयत्न करुन त्यातील 30 लोकांना भारतात सुखरूपपणे आणण्यात आले आहे. तर सध्या अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे जोरदार प्रयत्न भारत सरकारकडून सुरु आहेत.
भारतीय दूतावासाकडून आणि परराष्ट्र मंत्र्यालयाकडून बुधवारी ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे की, भारतीय नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून घेऊन जाणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहा.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी सांगितले की, आग्नेय म्यानमारच्या म्यावाडी भागात ओलिस ठेवलेल्या भारतीयांचा प्रश्न आता गंभीर आहे.
त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाला अशी माहिती समजली आहे की, थायलंडमधील आयटी कंपन्या रोजगारासाठी भारतीय लोकांची भरती करतात आणि त्यांना म्यानमारमध्ये घेऊन जातात. त्यामुळे भारतीय लोकांनी सावध राहिले पाहिजे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.
म्यानमारच्या म्यावाडी भागात 300 हून अधिक भारतीयांना ओलीस ठेवले गेले आहे. ज्या लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे, त्यामधील अनेक जण हे केरळचेच रहिवासी आहेत. थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांना सायबर गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले आहे.
ज्या लोकांना भारत सरकारने बाहेर काढले आहे, त्यांनी सांगितले की, ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांच्या बातम्या आता येऊ लागल्याने त्यांना इतर ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ओलीत ठेवलेले भारतीय आता इतर ठिकाणी ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने सांगितले आहे की, ज्या भारतीय लोकांना ओलीस ठेवले गेले आहे त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले जात होते.
सायबर गुन्हा करण्यास नकार देत आहेत म्हणून त्यांना विजेचा धक्का दिला जात आहे. म्यानमारमध्ये श्वे कोक्को नावाचे ‘अब्ज डॉलरचे कॅसिनो आणि पर्यटन संकुल’ हे चिनी उद्योगपती शी जिजियांग यांच्या मालकीचे आहे. त्यामध्ये त्यांच्या धाकातच तिथं काम करावे लागत आहे.
ओलीस ठेवलेल्या केरळच्या एका युवकाने सांगितले की, त्या कॅम्पला उंचच उंच भिंती बांधल्या गेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी स्नायपर रायफल असलेले रक्षकही आहेत.
तिथे काम करणाऱ्यांना 16- 16 तास कोणत्याही वेतन आणि पगाराशिवाय काम करावे लागत आहे.एकीकडे हे हाल सुरु असतानाच दुसरीकडे मात्र त्यांना जेवण न देणे, बंदुकीनं मारण्याची भीती घालणे यासारख्या गोष्टींमुळे अनेक भारतीयांना मानसिक धक्का बसला आहे.
या गोष्टी त्या कोणालाही सांगूही शकत नाहीत कारण त्या ठिकाणी काम करणाऱ्यांकडून त्यांचे मोबाईल काढून घेतले गेले आहेत.