British PM Boris Johnson on covid vaccine: भारताचे खूप खूप आभार, माझ्या दंडात इंडियन लस, इंग्लंड पंतप्रधान बोरीस जॉन्सन भारतीय कोविड लसींवर खूश

British PM Boris Johnson on covid vaccine: ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय बनावटीची कोरोनाची लस घेतली आहे. स्वत: जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे.

British PM Boris Johnson on covid vaccine: भारताचे खूप खूप आभार, माझ्या दंडात इंडियन लस, इंग्लंड पंतप्रधान बोरीस जॉन्सन भारतीय कोविड लसींवर खूश
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन भारतीय कोरोना लसवर नेमकं काय म्हणाले? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 6:00 PM

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) हे भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय बनावटीच्या कोरोना लसचं कौतुक केलं. (Boris Johnson India Visit) माझ्या हातात कोव्हिड व्हॅक्सीन आहे. या लसने मला बरं केलं. मी भारताचा खूप आभारी आहे, असं बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.. जॉन्सन यांचा आज भारत दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारत आणि ब्रिटनचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता. जॉन्सन यांच्या आताच्या भारत भेटीत या संबंधावर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर सह्याही करण्यात आल्या. भारत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. अशावेळी जॉन्सन यांचं भारतात येणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यात शुक्रवारी हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. त्यानंतर मोदी आणि जॉन्सन यांनी संयुक्त निवेदन दिलं. युक्रेनमध्ये त्वरीत शस्त्रसंधी व्हावी. चर्चेतून या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे. सर्व देशात अखंतडता आणि संप्रभुता नांदावी यावर आम्ही भर दिल्याचं या निवदेनात म्हटलं आहे.

अफगाणिस्तानवर चर्चा

अफगाणिस्तानच्या स्थितीवरही मोदींनी जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, त्यांची सुरक्षा निश्चित व्हावी आणि चांगलं सरकार यावं यासाठी पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा इतर देशात दहशतवाद निर्माण करण्यासाठी वापर केला जाऊ नये, यावरही चर्चा झाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.

व्यापार वृद्धीवर भर

या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार वाढवण्यावर भर दिला. फ्री ट्रेड अॅग्रीमेंटच्या विषयावर दोन्ही देशाच्या टीम काम करत आहेत. त्यात चांगली प्रगती होत आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आम्ही एफटीएच्या समारोपाच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडीवरही आम्ही चर्चा केली आहे, असं मोदींनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Boris Johnson India Tour Video: ब्रिटनचे पंतप्रधानही ‘बुलडोजर’च्या प्रेमात, गुजरात दौऱ्यात स्वत: स्टेअरींग केलं चेक

Boris Johnson India visit updates : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; कोणते प्रश्न मार्गी लागणार?

Omicron च्या आठ नव्या व्हेरिएंटमुळेच कोरोनाचा आलेख वाढला; गेल्या 24 तासात 2380 नव्या रुग्णांची नोंद, चौथी लाट येणार ?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.