भारतातील या दोन नेत्यांनी ‘रॉ’ एजंटची माहिती पाकिस्तानला पुरवली, मग सर्व एजंट मारले गेले… वरिष्ठ पत्रकाराचा खळबळजनक दावा

research and analysis wing: गुजराल यांनी भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (R&AW) च्या सर्व एजंटची नावे आणि पत्ते कागदावर लिहून पाकिस्तानला दिले आणि ते सर्व मारले गेले. याशिवाय हमीद अन्सारी हे इराणमध्ये भारताचे राजदूत होते. त्यावेळी त्यांनी इराणमध्ये आमचे जितके एजंट होते त्यांची माहिती दिली.

भारतातील या दोन नेत्यांनी 'रॉ' एजंटची माहिती पाकिस्तानला पुरवली, मग सर्व एजंट मारले गेले... वरिष्ठ पत्रकाराचा खळबळजनक दावा
research and analysis wing
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 10:11 AM

भारतातील राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी केला आहे. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत भारतातील नेत्यांनी पाकिस्तान आणि इराणला भारतीय एजंटची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ एजंटची माहिती तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी पाकिस्तानला दिली होती. तसेच माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी इराणला भारतीय रॉ एजंटची माहिती दिली होती. त्यानंतर त्या देशात असणारे सर्व भारतीय एजंट मारले गेले, असा दावा प्रदीप सिंह यांनी केला. त्यांच्या या मुलाखतीने वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

गोपनीय माहिती शत्रू राष्ट्रांकडे

रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ही भारताची विदेशात गुप्त माहिती काढणारी गुप्तचर संस्था आहे. त्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी ‘रॉ’कडून एजंट नियुक्त केले जातात. ही माहिती अत्यंत गोपनीय असते. देशातील कोणताही जबाबदार नेता किंवा अधिकारी ही माहिती इतर देशांना देणार नाही. परंतु भारतीय नेत्यांनी पाकिस्तान आणि इराणला ही माहिती दिली. वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी दावा केला की, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी ही माहिती इराण आणि पाकिस्तानला दिली. अगदी त्या देशात कोणता एजंट कोणत्या भागात काय नावाने राहतो, अशी सर्व माहिती दिली गेली. त्यामुळे भारतातील त्या देशातील सर्व ‘रॉ’ एजेंट मारले गेले होते.

हे सुद्धा वाचा

इराणालाही माहिती दिली

प्रदीप सिंह म्हणाले की, गुजराल यांनी भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (R&AW) च्या सर्व एजंटची नावे आणि पत्ते कागदावर लिहून पाकिस्तानला दिले आणि ते सर्व मारले गेले. याशिवाय हमीद अन्सारी हे इराणमध्ये भारताचे राजदूत होते. त्यावेळी त्यांनी इराणमध्ये आमचे जितके एजंट होते त्यांची माहिती दिली. ते सर्व मारले गेले.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तर पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबद्दल भारतीय एजंटांनी मोठ्या कष्टाने मिळवलेली संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना दिली होती. त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानात कार्यरत असलेले भारताचे सर्व एजंटांना आयएसआयने ठार केले होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.