अपहरण झालेल्या जहाजापर्यंत पोहोचले भारतीय नौदलाचे कमांडो
Indian navy cammandos : लष्करी अधिकाऱ्यांनी माहिती दिलीये की, जहाजावरील भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत आणि मरीन कमांडो मार्कोस कारवाईसाठी सज्ज आहे. भारतीय नौसेनेच्या जवानांनी या अपहरणकर्त्यांना आधी इशारा दिला आहे. जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे.
मुंबई : भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई सोमालियाच्या किनारपट्टीवरील एमव्ही लीला नॉरफोक या अपहरण जहाजावर पोहोचली आहे. भारतीय नौदलाने समुद्री डाकुंना जहाज सोडण्याचा इशारा दिला आहे. ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या मालवाहू जहाजाचे काल संध्याकाळी उशिरा सोमालियाच्या किनाऱ्यावर अपहरण करण्यात आले. जहाजावर 15 भारतीय होते.
नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील सागरी घटनेला तत्परतेने प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये लायबेरियन-ध्वज असलेल्या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते म्हणाले की जहाजाने यूकेएमटीओ पोर्टलवर एक संदेश पाठविला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सुमारे पाच ते सहा अज्ञात सशस्त्र लोक जहाजावर चढले आहेत.
Indian Navy’s elite Marine Commandos from the warship INS Chennai have embarked on the hijacked vessel MV Lila Norfolk and are now going to carry out sanitisation operations there: Military officials to ANI pic.twitter.com/JYsAKsywha
— ANI (@ANI) January 5, 2024
जहाजातून भारतीय नौदलाला याबाबत एक संदेश मिळला होता. त्यानंतर लगेचच तातडीने कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलाचे सागरी गस्त विमानाने उड्डाण केले आणि त्या जहाजाच्या दिशेने झेपावले. यानंतर त्यांनी जहाजाशी संपर्क केला. ज्यामध्ये भारतीय लोकं सुरक्षित असल्याची माहिती मिळाली.
एमव्ही लीला नॉरफोक या मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले होते. यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) या ब्रिटिश लष्करी संस्थेने गुरुवारी याबाबत माहिती दिली होती. ही संस्था जलमार्गांमधील विविध जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते.
Indian naval warship INS Chennai has reached the hijacked vessel MV Lila Norfolk off Somalia coast. The Indian warship has launched its helicopter and issued warning to pirates to abandon the hijacked vessel. The Indian crew on board are safe and Marine Commandos MARCOS are ready… pic.twitter.com/hYYREridg3
— ANI (@ANI) January 5, 2024
अलीकडेच समुद्रात एका नौकेवर हल्ला झाल्यानंतर नौदलाने समुद्रात अनेक युद्धनौका तैनात केल्या होत्या. यामध्ये भारताच्या किनारपट्टीवर ड्रोन हल्ल्याचाही समावेश आहे. ज्यासाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरले होते.