भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली, 27 दिवसांचे इंधन शिल्लक, 12 दिवसांपासून बिघाड दूर होईना
sunita williams: बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाडानंतर त्यांचे परत येणे चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता नवीन तारीख दिली नाही. बोइंगचा स्टारलाइनर कॅप्सूल 5 जून रोजी अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी फ्लोरिडा येथील कॅप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरुन रवाना झाले होते.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. गेल्या बारा दिवसांपासून सुनीता आणि त्याचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते 5 जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टाने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि 13 जूनला परतणार होते. परंतु गेल्या बारा दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनिअर दुरुस्त करु शकले नाही. आता त्यांच्याकडे केवळ 27 दिवसांचे इंधन शिल्लक आहे. त्याचे अंतराळयान स्टारलाइनरमधील हेलियम लीक होत असल्यामुळे ते परतू शकत नाही.
काय आहे बिघाड
बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाडानंतर त्यांचे परत येणे चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता नवीन तारीख दिली नाही. बोइंगचा स्टारलाइनर कॅप्सूल 5 जून रोजी अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी फ्लोरिडा येथील कॅप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरुन रवाना झाले होते. 25 तासांच्या उड्डानंतर इंजीनिअरांना स्पेसशिपमधील थ्रस्टर सिस्टममध्ये पाच ठिकाणी हेलियम लीक होत असल्याचे समजले. त्यानंतर अंतराळयान परत आणण्याचा निर्णय स्थगिती करण्यात आला.
दोघांना कोणताही धोका नाही, नासाचा दावा
अंतराळात सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर अडकले आहे. परंतु या दोघांनाही कोणताही धोका नसल्याचे नासाने म्हटले आहे. अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी इंजिनिअर काम करत आहेत. अंतराळयानाची क्षमता 45 दिवसांची आहे. त्यातील 18 दिवस झाले आहे. आता केवळ 27 दिवस राहिले आहेत. नासाचे हे दुसरे अंतळायान आहे. हे पहिल्यांदाच अंतराळात गेले आहे. नासासोबत बोइंगने 4.5 अब्ज डॉलरचा करार केला आहे. त्यातील 1.5 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.
सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात
59 वर्षीय सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात गेली आहे. यापूर्वी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. नासाने दिलेल्या माहितीनुसार. सुनीता एकूण 322 दिवस अंतराळात राहिल्या आहेत. 2006 मध्ये 195 दिवस तर 2012 मध्ये 127 दिवस सुनीता अंतराळात राहिल्या होत्या. 2012 मध्ये सुनीताने तीन वेळा स्पेस वॉक केली होती. स्पेस वॉक दरम्यान अंतराळवीर स्पेश स्टेशनमधून बाहेर येतात. सुनीता विल्यम्स अंतराळत जाणारी भारतीय वंशाची दुसरी महिला आहे. तिच्यापूर्वी कल्पना चावला अंतराळात गेली होती.