Indian Railway : रेल्वे अपघातात 10 पटींनी वाढली आर्थिक मदत, आता मिळणार इतके सानुग्रह अनुदान

Indian Railway : भारतीय रेल्वेने बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. अपघातातील मयताच्या कुटुंबांना अथवा गंभीर जखमींना सानुग्रह अनुदान वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही रक्कम पहिल्यापेक्षा 10 पटीने वाढविण्यात आली आहे.आता ही रक्कम वाढली आहे. किती वाढली ही रक्कम?

Indian Railway : रेल्वे अपघातात 10 पटींनी वाढली आर्थिक मदत, आता मिळणार इतके सानुग्रह अनुदान
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 11:42 AM

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : भारतीय रेल्वे बोर्डाने रेल्वे अपघातात (Train Accident ) मयताच्या कुटुंबियांना आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना अधिक आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या कुटुंबियांना तर गंभीर जखमींना यामुळे मदत मिळेल. रेल्वे बोर्डाने सानुग्रह अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सानुग्रह अनुदान 10 पटीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही रक्कम 2012 आणि 2013 मध्ये वाढविण्यात आली होती. त्यावेळी या रक्कमेत वाढ करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाने दहा वर्षानंतर सानुग्रह अनुदानाची रक्कम (Ex Gratis Relief) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन दुर्घटनेत अनेक जणांना प्रिय व्यक्ती गमावावी लागते. कोणाच्या कुटुंबाचा आधार हिरावतो. तर काही जणांना कायमचे अपंगत्व येते. त्यांना जादा नुकसान भरपाई मिळेल.

दोन दिवसांपूर्वी परिपत्रक

या 18 सप्टेंबर रोजी रेल्वे बोर्डाने परिपत्रक काढले. त्यानुसार, अपघात घडल्यास जखमी आणि मयताच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढविण्यात येणार आहे. रेल्वे फाटकावर अशात जास्त अपघात वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा नवीन नियम 18 सप्टेंबर रोजी लागू होईल. त्याचा फायदा अपघातग्रस्तांना होईल.

हे सुद्धा वाचा

किती मिळेल नुकसानभरपाई

रेल्वे बोर्डाच्या परिपत्रकानुसार, रेल्वे अपघातात जखमींना, मयतांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येईल. मयताच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तर गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये देण्यात येतील. किरकोळ जमखींना 50 हजार रुपयांची मदत मिळेल. पूर्वी ही रक्कम 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 5,000 रुपये अशी होती.

अशी देण्यात येईल मदत

परिपत्रकानुसार, मयत, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी यांना त्यानुसार मदत देण्यात येईल. दुर्घटनेत जखमींना 1.5 लाख रुपये, 50,000 रुपये आणि 5,000 रुपये अशी मदत देण्यात येते. गेल्या वेळी ही नुकसान भरपाईची रक्कम 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 5,000 रुपये होती. दुर्घटनेत दहशतवादी हल्ला, जमावाचा हल्ला, ट्रेनवर दरोडा, लुटपाट या घटनांचा समावेश आहे.

रुग्णालयात भरती नंतर मदत

ट्रेन अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना 30 दिवसांपेक्षा अधिक वेळ रुग्णालयात भरती केल्यास त्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळेल. प्रत्येक 10 दिवसानंतर प्रवाशांना 3,000 रुपये प्रति दिवस मदत करण्यात येईल. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना सहा महिन्यापर्यंत प्रति दिवस 1,500 रुपये मदत देण्यात येईल. पण ही मदत मिळताना अटी आणि शर्तींचे पालन करावे लागेल. तसेच आवश्यक कागदपत्रं पण सादर करावी लागतील.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.