ना तिकीट दरवाढ, ना मालभाड्यात वाढ, पण रेल्वे मालामाल, भारतीय रेल्वेने शोधला हा अनोखा पर्याय
रेल्वे मंत्रालयाने सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 36.25 लाख यूनिट सौर ऊर्जाचे उत्पादन केले. त्यामुळे 1.37 कोटी रुपयांची बचत झाली आहे. रेल्वेचा हा निर्णय उत्पन्न वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिझेलचा वापर कमी झाला.
भारतीय रेल्वेने गेल्या अनेक वर्षांपासून तिकीट दरात वाढ केली नाही. मालभाडे वाढवले नाही. त्यानंतर रेल्वेने उत्पन्न वाढवले आहे. त्या उत्पनामुळे रेल्वे मालामाल झाली आहे. प्रवाशांकडून काही न घेता रेल्वे मालामाल कशी होत आहे? या प्रश्नाचे उत्तर सौर उर्जा आहे. रेल्वेने विविध ठिकाणी सौर पॅनल लावून विजेची आणि डिझेलची बचत केली आहे. सौर उर्जा पॅनल लावण्याचा निर्णय रेल्वे आता सर्व विभागात लागू करणार आहे.
पर्यावरणासाठी फायदेशीर निर्णय
रेल्वे मंत्रालयाने सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 36.25 लाख यूनिट सौर ऊर्जाचे उत्पादन केले. त्यामुळे 1.37 कोटी रुपयांची बचत झाली आहे. रेल्वेचा हा निर्णय उत्पन्न वाढवण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिझेलचा वापर कमी झाला. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरला आहे.
या रेल्वे स्थानकात सौर पॅनल
लालकुआन आणि रामनगर स्थानकांवर 50 KWp, टनकपूर येथे 30 KWp, कासगंज आणि बदायूं स्थानकांवर 20 KWp, फारुखाबाद आणि कन्नौज येथे 15 KWp, गंजदुंडवारा, रावतपूर, मथुरा कँट, पिलीभीत, फतेहगढ, रुद्रपूर सिटी, हल्दवानी, काठगोदाम आणि खातिमा स्थानकांवर 10 केडब्ल्यूपीसह 16 स्थानकांवर 285 किलो वॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर पॅनेल लावले गेले आहेत.
अशी आहे भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वेने रोज 2 कोटी 40 लाख लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे चौथे नेटवर्क आहेत. देशात रोज जवळपास 22,593 ट्रेन धावतात. त्यात 13,452 प्रवासी ट्रेन आहेत. या रेल्वे जवळपास 7,325 स्टेशन कव्हर करतात. रेल्वेच्या या संख्येत मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. तसेच रेल्वेच्या 9141 मालगाड्याही रोज धावतात. त्या माध्यमातून देशाच्या सर्व भागात सामान पोहचवले जाते. रेल्वेकडून रोज 20.38 कोटी मालाची वाहतूक होते. तसेच मालगाडी आणि प्रवाशी रेल्वे मिळून रोज 67,368 किलोमीटर अंतर कापले जाते.