Indian Railways: रेल्वे प्रवाशांना सुखद भेट… रेल्वेत जागा न मिळण्याची समस्या सुटणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा नवा प्लॅन

indian railways: भारतीय रेल्वेला आता 10 हजार नॉन-एसी डबे तयार करण्यास परवानगी दिली आहे. 2024-25 मध्ये 4485 आणि 2025-26 मध्ये 5444 डबे तयार केले जातील. यातील बहुतांश डबे सामान्य श्रेणीतील असतील.

Indian Railways: रेल्वे प्रवाशांना सुखद भेट... रेल्वेत जागा न मिळण्याची समस्या सुटणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा नवा प्लॅन
INDIAN RAILWAYImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 9:33 AM

भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटले जाते. रोज 2 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या या गर्दीमुळे रेल्वेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. दुसरीकडे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होत नाही. त्यांना आरक्षण मिळणे अवघड असते. आरक्षण मिळाल्यावर शयनयान श्रेणीची परिस्थिती जनरल डब्यासारखी होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशी आता एसी क्लासने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. परंतु एसी क्लासचे तिकीट दर जास्त असल्यामुळे सर्वच प्रवाशांना त्याचा फायदा घेता येत नाही. रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन प्लॅन तयार केला आहे. यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना रेल्वेत जागा मिळणे सोपे होणार आहे.

काय आहे रेल्वे मंत्र्यांचा प्लॅन

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी सरकारने भारतीय रेल्वेला आता 10 हजार नॉन-एसी डबे तयार करण्यास परवानगी दिली आहे. 2024-25 मध्ये 4485 आणि 2025-26 मध्ये 5444 डबे तयार केले जातील. यातील बहुतांश डबे सामान्य श्रेणीतील असतील. 2025-26 या आर्थिक वर्षात, रेल्वेने अमृत भारत जनरल कोचसह 2710 सामान्य डबे तयार करण्याची योजना आखली आहे. अमृत भारत स्लीपर कोचसह 1910 नॉन एसी स्लीपर, अमृत भारत एसएलआर कोचसह 514 एसएलआर कोच, 200 उच्च क्षमतेच्या पार्सल व्हॅन आणि 110 पॅन्ट्री कार तयार करण्याची योजना आहे.

सर्वसाधारण डबे वाढणार

रेल्वेच्या या योजनेमुळे सर्वसाधारण कोचची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेत जागा मिळणार आहे. जवळपास सर्वच एक्स्प्रेस अन् मेलमध्ये दोनच जनरल डबे असतात. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

हे सुद्धा वाचा

रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अचानक पाहणी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंग बिट्टू यांनी रेल्वे बोर्डाच्या कॅन्टीनची अचानक पाहणी केली. लंच टाईम दरम्यान मंत्र्यांनी कॅन्टीनमधील सुविधा आणि सेवांचा आढावा घेतला. या पाहणीवेळी रेल्वे बोर्डाचे सचिव आणि रेल्वे बोर्डाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. रेल्वे बोर्डमधील कर्मचाऱ्यांनी कॅन्टीनमधील सेवेसंदर्भात समाधान व्यक्त केले. रवनीतसिंग बिट्टू यांनी स्वच्छता आणि दर्जा कायम ठेवण्याचे निर्देश यावेळी दिले.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.