आता रेल्वेत झोपा बिंधास्त!, डेस्टिनेशन अलर्ट सेवा तुम्हाला जागं करेल, केवळ बोटावर मोजता येईल एवढ्या पैश्यात…

| Updated on: Jun 03, 2022 | 6:10 PM

भारतीय रेल्वेवे आपल्या प्रवाशांच्या सेवेत आणखी एक सुविधा आणली आहे. भारतीय रेल्वेने डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुविधा सुरू केली आहे.

आता रेल्वेत झोपा बिंधास्त!, डेस्टिनेशन अलर्ट सेवा तुम्हाला जागं करेल, केवळ बोटावर मोजता येईल एवढ्या पैश्यात...
Follow us on

मुंबई : आपण अनेकदा रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतो. हा प्रवास अनेकदा लांब पल्ल्याचा असतो. यात प्रवासी झोपतात. पण झोपताना अनेकदा धाकधुक असते की आपलं स्टेशन येईपर्यंत आपल्याला जाग तर येईल ना? झोपेमुळे चुकून आपण आपल्या स्टेशनच्या पुढे तर जाणार नाही ना?, अशी भिती मनात असते. पण आता रेल्वेत तुम्ही बिंधास्त झोपू शकता. कारण रेल्वेने नवी सुविधा (Destination Alert Service) आणली आहे. त्यामुळे तुम्ही आरामात झोप काढा रेल्वेची नवी सुविधा तुम्हाला अलर्ट करेल.

रेल्वेची नवी सुविधा

भारतीय रेल्वेवे आपल्या प्रवाशांच्या सेवेत आणखी एक सुविधा आणली आहे. भारतीय रेल्वेने डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुविधा सुरू केली आहे. प्रवासादरम्यान अनेकवेळा झोपेमुळे प्रवाशांचे स्टेशन मागे राहते. त्यामुळे रेल्वेने आता डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना आता स्टेशन चुकण्याची चिंता न करता ट्रेनमध्ये झोपता येणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी रेल्वेने वेकअप अलर्ट सुविधा सुरू केली आहे. प्रवाशाला त्याच्या स्टेशनच्या येण्याच्या आधी 20 मिनिटे अलर्ट केलं जाईल.

डेस्टिनेशन अलर्ट प्रक्रिया काय आहे?

प्रवाशाला प्रथम IRCTC रजिस्टर मोबाईल नंबरवरून 139 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करावा लागेल. त्यानंतर भाषा निवडावी लागते. त्यानंतर डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी 7 नंबर आणि नंतर 2 नंबर दाबावा लागेल. त्यानंतर प्रवाशांला पीएनआर क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर पीएनआर नंबर टाकला की खात्री करण्यासाठी 1 हा अंक डायल करावा लागेल. या प्रक्रियेनंतर IRCTC सिस्टम PNR नंबरची पडताळणी करेल आणि तुमच्या रजिस्टर स्टेशनसाठी वेकअप अलर्टची नोंद करेल. करेल. यानंतर खात्रीसाठी तुम्हाला मोबाईलवर एसएमएस येईल.

हे सुद्धा वाचा

किती रक्कम मोजावी लागेल?

डेस्टिनेशन अलर्ट ही सुविधा तुम्ही घेतली तर त्याअंतर्गत तुमच्या स्टेशनच्या आधी 20 मिनिटे आधी मोबाईलवर वेकअप कॉल येईल. त्यामुळे तुम्ही अलर्ट व्हाल. या सुविधेसाठी तुम्हाला 3 रुपये मोजावे लागतील. ही सुविधा रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.