रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय, इतिहास बनणार निळ्या रंगाचे डब्बे, रेल्वेने का घेतला हा निर्णय?
Indian Railways: difference between blue and red couch: लाल कोच म्हणजे लिंक हॉफमेन बुश (एलएचबी) कोच बनवण्याची फॅक्ट्री पंजाबमधील कपूरथला येथे आहे. 2000 मध्ये जर्मनीतून हे तंत्रज्ञान आणले गेले. हे डब्बे स्टेनलेस स्टीलपासून बनत असल्यामुळे वजनाने हलके असतात.
Indian Railways: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक गाड्यांवर दोन रंगाचे कोच दिसतात. काही गाड्यांवर निळ्या रंगाचे कोच असतात तर काही रेल्वेंना लाल रंगाचे कोच असतात. अनेकांना वाटते या कोचमध्ये केवळ रंगच बदलला आहे. परंतु प्रत्यक्षात रंगच नाही तर दोन्ही कोचचे तंत्रज्ञानही वेगवेगळे आहे. निळ्या रंगाचे कोच जुन्या तंत्रज्ञानाचे आहेत. आता भारतीय रेल्वेने निळ्या रंगाचे डब्बे बदलण्यास सुरुवात केली आहे. आता सर्व रेल्वेचे डब्बे लाल रंगाचे होणार आहे. निळे डब्बे इतिहास जमा होणार आहे. 2026-27 या आर्थिक वर्षापर्यंत सर्व डबे नवीन लाल रंगाचे म्हणजे नवीन तंत्रज्ञान असणारे करण्यात येणार आहे.
असा होत आहे बदल
भारतीय रेल्वेचे सध्या दोन प्रकारचे कोच आहेत. आयसीएफ (इंटीग्रल कोच फॅक्ट्री) आणि एलएचबी (लिंक हॉफमेन बुश) असे हे तंत्रज्ञान आहे. आयसीएफ तंत्रज्ञान जुने आहे. तर एलएचबी तंत्रज्ञान नवीन आहे. आयसीएफ कोच निळ्या रंगाचे तर एलएचबी कोच लाल रंगाचे असते. भारतीय रेल्वे जुन्या तंत्रज्ञानाचे डब्बे हळूहळू काढत आहे. त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान असणारे एलएचबी कोच लागणार आहे.
भारतीय रेल्वे मार्च 2000 पासून एलएचबी कोचची निर्मिती करत आहे. हे कोच स्लीपर आणि जनरल श्रेणीचे आहेत. आतापर्यंत 1300 कोच लावण्यात आले आहे. 700 एलएचबी करण्याचे राहिले आहे. हे सर्व कोच 2026-27 पर्यंत एलएचबी करण्यात येणार आहे.
असा आहे दोन्ही कोचमधील फरक
निळ्या रंगाचे कोच 1952 पासून चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत तयार होत आहेत. हे कोच स्टीलपासून बनतात. त्यात एअर ब्रेक प्रणाली असते. तसेच त्याचा देखरेख खर्चही जास्त आहे. त्यात स्लीपरमध्ये 72 तर थर्ड एसीमध्ये 64 प्रवाशी प्रवास करु शकतात. हे कोच एलएचबी कोचपेक्षा 1.7 मीटर लहान असतात. अपघाताच्या वेळी हे कोच एकमेकांवर चढतात.
दुसरीकडे लाल कोच म्हणजे लिंक हॉफमेन बुश (एलएचबी) कोच बनवण्याची फॅक्ट्री पंजाबमधील कपूरथला येथे आहे. 2000 मध्ये जर्मनीतून हे तंत्रज्ञान आणले गेले. हे डब्बे स्टेनलेस स्टीलपासून बनत असल्यामुळे वजनाने हलके असतात. तसेच त्यात डिस्क ब्रेक असते. 200 किमी प्रतीतास वेग हे कोच सहन करु शकतात. त्याचा देखभाल खर्चही कमी आहे. या कोचमध्ये स्लीपर श्रेणीत 80 तर थर्ड एसीमध्ये 72 प्रवासी असतात. तसेच अपघात झाल्यावर हे डब्बे एकमेकांवर चढत नाही.