रेल्वेचं खासगीकरण कधीच होणार नाही, पण..; वाचा, पीयूष गोयल काय म्हणाले?
रेल्वेचं कधीच खासगीकरण होणार नाही, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. (Indian Railways will never be privatised: Piyush Goyal)
नवी दिल्ली: रेल्वेचं कधीच खासगीकरण होणार नाही, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. रेल्वेही भारताची संपत्ती आहे आणि ती कायम भारत सरकारच्या ताब्यात राहील. पण रेल्वेत सुधारणा घडवून आणायच्या असेल तर रेल्वेत खासगी गुंतवणुकीचं स्वागत करायला हवं, असं गोयल यांनी स्पष्ट केलं. (Indian Railways will never be privatised: Piyush Goyal)
लोकसभेत बोलताना पीयूष गोयल यांनी हा निर्वाळा दिला. 2004-09च्या दरम्यान रेल्वेत फक्त 1.25 लाख कोटी म्हणजे दरवर्षी केवळ 25 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. तर 2009-2014दरम्यान सरासरी 45 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकार वेगाने काम करत आहे, असं गोयल म्हणाले.
रेल्वेतील खासगी गुंतवणुकीचं स्वागत करा
आमचं सरकार आल्यानंतर रेल्वेत 2014-19 दरम्यान सुमारे 5 लाख कोटीं म्हणजे दरवर्षी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 2019-20मद्येच 1.5 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. आमच्यावर विरोधकांकडून रेल्वेच्या खासगीकरणाचा आरोप केला जातो. पण रस्त्यावर केवळ सरकारी गाड्याच धावल्या पाहिजेत असं कधी विरोधकांकडून बोललं जात नाही. रोड ही एक सुविधा आहे. त्यामुळे त्यावरून खासगी आणि सरकारी गाड्या जेवढ्या चालतील तेवढाच अर्थव्यवस्थेला फायदा होईल. त्यामुळेच रेल्वेतील खासगी गुंतवणुकीचं स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे सेवांमध्ये सुधारणा होईल, असंही ते म्हणाले.
स्थानकांच्या सौंदर्यीकरणासाठी गुंतवणूक आवश्यकच
जागतिक दर्जाची रेल्वे स्टेशने बनवायची असेल तर त्यासाठी लाखो करोडो रुपयांचा खर्च आहे. अमृतसर स्टेशनसाठी आम्ही 230 रुपये खर्च करणार आहोत. या रेल्वेस्थानकात जो जाईल त्याची मान अभिमानाने उंचावेल. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनसाठी 5000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनाच्या सौंदर्यीकरणासाठी खासगी गुंतवणूक येत असेल तर ती देश आणि प्रवाशांच्या हिताचीच असेल, असं त्यांनी सांगितलं.
2030साठी रेल्वेचा मेगा प्लान
खासगी क्षेत्र वाढल्याने देशातील उद्योगाला चालना मिळेल. रोजगाराच्या संधी वाढतील. सरकार आणि खासगी क्षेत्रांनी मिळून काम केल्यास देशाचं भविष्य उज्ज्वल होईल. आम्ही 2030 साठी रेल्वेचा प्लान तयार केला आहे, असं सांगतानाच एक वर्षाच्या आत मालगाड्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून रेल्वेला नेहमीच दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Indian Railways will never be privatised: Piyush Goyal)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/85f9PM9pYl
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 15, 2021
संबंधित बातम्या:
1 एप्रिलपासून नोकरदारांच्या कामाचे तास वाढणार?
‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय?’, कोलकात्यात बसून कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप!
देशातल्या पॉवरफुल मुख्यमंत्र्यांचाही जेव्हा कलेक्टर, कमिश्नर फोन उचलत नाहीत!
(Indian Railways will never be privatised: Piyush Goyal)