स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशांमध्ये मोठी घसरण, रक्कम चार वर्षांतील नीचांकावर कारण…

Swiss Bank Report: स्वित्झर्लंड बँक नेहमी चर्चेत राहिली आहे. कारण गोपनीयता कायद्याचे कलम 47 आहे. यामुळे या बँकेत खाते उघडणाऱ्यांची माहिती दिली जात नाही. स्विस बँकेत भारतीयांचा पैसा आहे, ही माहिती मिळते. परंतु या पैशांचा मालक कोण आहे? ही माहिती दिली जात नाही.

स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशांमध्ये मोठी घसरण, रक्कम चार वर्षांतील नीचांकावर कारण...
Swiss Banks
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 2:21 PM

भारतात निवडणुकांमध्ये स्वित्झर्लंडमधील स्विस बँकांची चर्चा होत होती. भारतीय लोकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणावर स्विस बँकेत असल्याचे म्हटले जाते. स्विस बँकेकडून कोणाचा किती पैसा जमा आहे, त्याची नावे मिळत नसल्यामुळे उद्योजक, राजकारणी लोकांचा काळा पैसा त्या बँकेत जमा असतो. परंतु आता स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. भारतीय लोक आणि कंपन्यांनी स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशात 2023 मध्ये 70 टक्क्यांनी घट झाली आहे. हा आकडा चार वर्षांच्या नीचांकी 1.04 अब्ज स्विस फ्रँक (9,771 कोटी रुपये) वर आला आहे. 2021 मध्ये स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 14 वर्षातील उच्चांकावर होतो. त्यावेळी 3.83 अब्ज स्विस फ्रँक रक्कम भारतीयांची होती.

सलग दुसऱ्या वर्षी घसरण

स्विस नॅशनल बँकेच्या अहवालातील माहितीनुसार, भारतीयांची स्विस बँकेतील रक्कम 2006 मध्ये एकूण 6.5 अब्ज स्विस फ्रँक इतकी विक्रमी उच्चांकी होती. यानंतर, 2011, 2013, 2017, 2020 आणि 2021 या वर्षांमध्ये रक्कम वाढली होती. परंतु आता सलग दुसऱ्या वर्षी स्विस बँकेतील रक्कमेत घसरण झाली आहे. स्विस बँकांमधील भारतीय ग्राहकांच्या निधीतील घट हे मुख्यत्वे रोखे आणि इतर विविध वित्तीय साधनांमध्ये असलेल्या निधीमध्ये घट झाल्यामुळे होत आहे.

मागील दोन दशके स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा सातत्याने कमी होत आहे. त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. या घसरणीचे कारण रोख्यांच्या किमतीत झालेल्या घसरणीबरोबरच आर्थिक साधनांच्या स्वरुपातील गुंतवणुकीत झालेली घट असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

बँकेत गोपनीयता कायदा

स्वित्झर्लंड बँक नेहमी चर्चेत राहिली आहे. कारण गोपनीयता कायद्याचे कलम 47 आहे. यामुळे या बँकेत खाते उघडणाऱ्यांची माहिती दिली जात नाही. स्विस बँकेत भारतीयांचा पैसा आहे, ही माहिती मिळते. परंतु या पैशांचा मालक कोण आहे? ही माहिती दिली जात नाही. ज्या लोकांनी किंवा कंपनीने बँकेत रक्कम ठेवली आहे, त्याची माहिती कोणत्याही कारणासाठी बँक कधीच देत नाही.

Non Stop LIVE Update
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.