AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिले AI सिटी असेल कशी? वाहतूक, आरोग्य सर्वच कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावणार, तुमच्या शहराचा नंबर केव्हा?

India First AI City : देशातील पहिली एआय शहराची सध्या एकच चर्चा सुरू आहे. बदलत्या जगाचा पासवर्ड हाताशी घेत, देशातील अनेक व्यवस्था लवकरच बदलण्याची शक्यता आहे. त्यातच आता एआय सिटीचा प्रयोग होत आहे.

देशातील पहिले AI सिटी असेल कशी? वाहतूक, आरोग्य सर्वच कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावणार, तुमच्या शहराचा नंबर केव्हा?
Follow us
| Updated on: Feb 21, 2025 | 11:57 AM

कृत्रिम बुद्धिमत्ता आता अनेक क्षेत्र व्यापून टाकणार आहे. Artificial Intelligence चा वापर दिवसागणिक वाढत आहे. एआय मोबाईलचे युग आले आहे. त्यात शहरं आणि गावं सुद्धा आता मागे राहणार नाहीत. लवकरच देशातील पहिले एआय शहर अस्तित्वात येत आहे. त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावतील. हा प्रयोग उत्तर भारतात होत आहे.

लखनऊ होणार पहिली एआय सिटी

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2025 सादर केला होता. राजधानी लखनऊ ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी (AI City) होईल. त्यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. . वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवरच काम करतील.

हे सुद्धा वाचा

TOI च्या वृत्तानुसार, या शहरात AI इकोसिस्‍टम मजबूत करण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येतील. योगी सरकार उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणि परदेशी कंपन्यांना आकर्षीत करण्यासाठी अनेक सोयी-सुविधा उभारण्यात येत आहे. त्यात एआय इकोसिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. आयटी क्षेत्र वाढीवर भर देण्यात येत आहे.

काय होईल परिणाम

बड्या कंपन्यांसाठी एआय स्टार्टअप्ससाठी पायघड्या घालण्यात येईल. त्यांना एआय सुविधा देण्यात येतील.

या कंपन्यांना करात विशेष सवलत देण्यात येतील. त्यांच्यासाठी इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्यात येईल. एआयच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्र तयार करण्यात येईल.

योगी सरकार या शहरात एआय अनुकूल सेवा पुरवेल. करात सवलत, सबसिडी आणि तशी धोरण राबवण्यात येईल.

शहरात भविष्यातील दळणवळण व्यवस्थेसाठी खास योजना आखण्यात येईल. शहरात हायस्पीड इंटरनेट, क्लाउड कम्युटिंग सेंटर आणि एआय प्रयोगशाळा उभारण्यात येईल.

या शहरात एआय संबंधित शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि विद्यापीठ असेल. त्यामाध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न करण्यात येईल.

तर सातत्याने एआयचा विकास व्हावा यासाठी एआय संमेलन भरवण्यात येतील. सार्वजनिक सेवांसाठी एआयचा वापर करण्यात येईल. नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरूनच अनेक सुविधा एका क्लिकवर मिळतील.

केंद्र सरकारने AI मिशनसाठी 10,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 2024 च्या सुरुवातीलाच देशात जवळपास 240 जनरेटिव AI स्टार्टअप सुरू झाले आहेत. जगात एआय बाबत भारताचा सध्या सहावा क्रमांक लागतो. लखनऊचा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर शहरे सुद्धा एआय सुविधांसाठी पुढे येण्याची शक्यता आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.