Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Namo Bharat | तिकीट फक्त 50 रुपये, स्पीडमध्ये ‘वंदे भारत’ला मागे टाकणार ‘ही’ ट्रेन, आज मोदी करणार उद्घाटन

Namo Bharat | देशात रॅपिड रेल प्रोजेक्ट सुरु आहे. आता या प्रोजेक्ट अंतर्गत पहिली ट्रेन धावणार आहे. स्पीड या ट्रेनची खासियत असेल, सध्या वंदे भारत ही सेमी हायस्पीड ट्रेन आहे. नवी ट्रेन वेगाच्या बाबतीत वंदे भारतला टक्कर देईल. आज नवीन ट्रेन पहिल्या फेजमध्ये किती किमीच्या मार्गावर धावणार ते जाणून घ्या.

Namo Bharat | तिकीट फक्त 50 रुपये, स्पीडमध्ये 'वंदे भारत'ला मागे टाकणार 'ही' ट्रेन, आज मोदी करणार उद्घाटन
Namo Bharat Train
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 9:15 AM

नवी दिल्ली : देशातील पहिली रॅपिड मेट्रो म्हणजे नमो भारत ट्रेन रुळावर धावण्यासाठी तयार आहे. आज 20 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी गाजियाबाद येथे रॅपिड ट्रेन नमो भारतला हिरवा झेंडा दाखवतील. दिल्ली ते मेरठ हा 82 किलोमीटरचा मोठा कॉरिडोर आहे. पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिबाबाद ते दुहाई या 17 किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे. शुक्रवारी उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला या ट्रेनमधून प्रवास करता येईल. नमो भारत ट्रेन 2025 पर्यंत दिल्लीच्या सराय काला खां पासून मेरठच्या मदीपुरम स्टेशनपर्यंत वेगाने धावताना दिसेल. नमो भारत ट्रेनचा स्पीड वंदे भारतापेक्षा पण जास्त आहे. तिकीटाचे दर सुद्धा कमी आहेत. या ट्रेनचे तिकीट दर आणि स्पीड बद्दल जाणून घ्या.

नमो भारत रॅपिड एक्सच वैशिष्ट्य हे आहे की, या ट्रेनचा स्पीड 160 किमी प्रतितास आहे. ही ट्रेन देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारताला वेगामध्ये टक्कर देईल. रॅपिडएक्समध्ये सेफ्टीची जबाबदारी आर्टिफिशल इंटेलिजेंसवर असेल. या ट्रेनमध्ये ओव्हरहेड सामान रेक, वाय-फाय, प्रत्येक सीटसाठी मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आलीय. सध्या देशात वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. या ट्रेनला प्रवाशांची मोठी पसंती मिळतेय. लवकरच रॅपिड मेट्रो म्हणजे नमो भारत ट्रेनला सुद्धा तशीच पसंती मिळेल. रॅपिडएक्स ट्रेनचा तिकीट दर काय असेल?

तिकीटसाठी डिजिटल क्यू आर कोड बेस तिकीट मोड सुरु केलं जाईल. रॅपिडएक्स कनेक्ट App च्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या तिकीट बुक करु शकता. त्याशिवाय नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या माध्यमातून तुम्ही प्रवास करु शकता. या ट्रेनमध्ये दिल्ली मेट्रोच कार्ड चालणार नाही. एनसीएमसी कार्डला कमीत कमी 100 रुपयापर्यंत रिचार्ज कराव लागेल. रॅपिड रेल प्रोजेक्ट दिल्ली ते मेरठपर्यंत बनणार आहे. हे अंतर एकूण 82 किलोमीटर आहे. पहिल्या फेजमध्ये दुहाई ते साहिबाबाद हा 17 किलोमीटरचा टप्पा सुरु होईल. पहिल्या फेजमध्ये साहिबाबाद, गाजियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो हे एकूण पाच स्टेशन्स आहेत. मेरठ ते साहिबाबाद दरम्यान तिकीट दर 170 ते 200 रुपये असू शकतो.