Chandrayaan-3 | भारताच्या मिशन लॉन्चला एक दिवस उरलेला असताना चीनकडून चांद्र मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा

Chandrayaan-3 | चीनने या घोषणेमधून आपण सुपर पॉवर असल्याच दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. नेमकी ही घोषणा काय? आता पुन्हा चंद्र मोहिमा इतक्या का वाढल्या ? त्यामागे काय कारण आहे?

Chandrayaan-3 | भारताच्या मिशन लॉन्चला एक दिवस उरलेला असताना चीनकडून चांद्र मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा
Nasa Moon MissionImage Credit source: Nasa
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 1:32 PM

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेला आता फक्त एक दिवस उरला आहे. भारतीय अवकाश संसोधन संस्था इस्रो चांद्रयान-3 च्या लॉन्चिंगसाठी सज्ज आहे. समस्त भारतीयांचे डोळे या महत्वकांक्षी मोहिमेकडे लागले आहेत. चंद्रावर लँडरच यशस्वी लँडिंग आणि रोव्हरच्या माध्यमातून संशोधन ही इस्रो समोरची दोन मुख्य लक्ष्य आहेत. भारतीय चांद्रयान-3 मिशन लॉन्चिंगच्या प्रतिक्षेत असताना शेजारच्या चीनने मोठी घोषणा केली आहे.

इतर क्षेत्रांप्रमाणे भारत आणि चीनमध्ये अवकाश संशोधन क्षेत्रातही स्पर्धा आहे. भारताची मिशन डेट जवळ आलेली असताना, आता चीनने त्यांच्या चांद्र मोहिमेची घोषणा केली आहे.

चीनच मिशन काय आहे?

चीनने त्यांच्या मानवी चंद्र मोहिमेची घोषणा केली आहे. 2030 मध्ये मानवाला चंद्रावर पाठवण्याची चीनची योजना आहे. चीन या मिशन अंतर्गत दोन रॉकेट्स चंद्राच्या कक्षेत पाठवणार आहे. सध्या जगामध्ये अमेरिका एकमेव देश आहे, ज्यांनी अपोलो मिशन अंतर्गत 1968 ते 1972 दरम्यान मानवी चंद्र मोहिमा केल्या आहेत. अमेरिके व्यतिरिक्त कुठल्याही देशाने चंद्रावर माणूस पाठवलेला नाही.

आता पुन्हा चंद्र मोहिमा इतक्या का वाढल्या ?

मानवी अवकाश मोहिम प्रत्यक्षात आण्यासाठी चीनला अजून शक्तीशाली रॉकेट विकसित करण्यात तंत्रज्ञान अवगत झालेलं नाही. चीनच्या मानवी मोहिमेत, वैज्ञानिक उद्दिष्टय पूर्ण केल्यानंतर लँडर पुन्हा अवकाशवीरांना घेऊन चंद्रावर येईल. चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमांना पुन्हा एकदा गती आली आहे. चंद्रावरील खनिजांचा शोध घेणं, हे अमेरिका आणि चीनच मुख्य लक्ष्य आहे. चंद्रावर मानवी वस्ती स्थापित करणं शक्य आहे का? हा सुद्धा उद्देश आहे. सध्या मंगळ ग्रहावर त्याच दृष्टीने संशोधन सुरु आहे. भारताची चांद्रयान-2 मोहिम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. मिशन पूर्ण व्हायला शेवटची काही मिनिट बाकी असताना इस्रोचा लँडरशी संर्पक तुटला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.