नवी दिल्ली: न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनच्यावीतनं देशातील अग्रेसर न्यूज नेटवर्क असणाऱ्या टीव्ही 9 नेटवर्कचं फेडरशेनमध्ये स्वागत करण्यात आलं. एनबीएफ ही संस्था देशातील ब्रॉडकास्टर्सची मोठी संस्था आहे. टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांची एनबीएफच्या वाईस प्रेसिंडेट पदी निवड करण्यात आली आहे. एनबीएफशी जोडलं जाणं आमच्यासाठी आनंददायी असल्याचं बरुण दास म्हणाले. तर, एनबीएफच्या शिष्टमंडळानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बार्क संस्थेकडून टीआरपी जाहीर केला जावा, अशी मागणी करण्यात आली.
एनबीएफचे चेअरमन अर्णब गोस्वामी आणि इतर सदस्य ज्या लोकशाही मार्गानं संस्थेचं काम पाहात आहेत, त्यामुळं प्रभावित झाल्याचं बरुण दास म्हणाले. टीव्ही इंडस्ट्रीला प्रादेशिक बातम्यांमध्यून सर्वाधिक प्रेक्षक आणि उत्पन्न मिळते. प्रादेशिक बातम्यांना योग्य स्थान आणि आवाज दिल्यास टीव्ही इंडस्ट्रीची वाटचाल योग्य दिशेनं राहिलं. एनबीएफकडून प्रादेशिक ब्रॉडकास्टर्सना संतुलित पद्धतीनं योग्य प्रतिनिधीत्व दिलं जातंय, असंही बरुण दास म्हणाले.
एनबीएफचे चेअरमन अर्णब गोस्वामी यांनी टीव्ही 9 नेटवर्क न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमांचं प्रतिनिधीत्व करणारी संस्था म्हणून एनबीएफविषयी अभिमान वाटतो, असं अर्णब गोस्वामी म्हणाले. एनबीएफ ही लोकशाही मार्गानं चालणारी माध्यमांची संस्था आहे. एनबीएफ ही नव्या भारतातील सर्वांसाठी मोठी ब्रॉडकास्टर्सची संस्था आहे, असंही ते म्हणाले.
न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशन (एनबीएफ) चे कार्यकारिणी सदस्य आणि वरिष्ठ सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री न्यूज इंडस्ट्रीसमोरील आव्हान, माध्यमांमधील बदलणारे ट्रेंड आणि विकास यासंदर्भात विचार करत असल्यानं एनबीएफच्यावतीनं त्यांना धन्यवाद देण्यात आले. न्यूज चॅनेलचे टीआरपी पुन्हा एकदा लवकर सुरु करण्यात यावेत, असी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे एनबीएफकडून करण्यात आली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एनबीएफचे प्रमुख अर्णब गोस्वामी आणि सहकाऱ्यांशी चर्चा झाली. चर्चेदरम्यान मतांची देवाणघेवाण झाली. एनबीएफ सोबत न्यूज ब्रॉडकास्टिंगच्या समस्या सोडवण्यासोबत काम करु, असंही ते म्हणाले. न्यूज ब्रॉडकास्टिंग लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करते, असंही अनुराग ठाकूर म्हणाले.
टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एनबीएफचे वाईस प्रेसिडंट बरुण दास यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत एनबीफच्या शिष्टमंडळात समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला. तर, टीव्ही क्षेत्र स्पर्धात्मक असून त्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर नवनव्या प्रभावशाली माध्यमांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
एनबीएफच्या शिष्टमंडळात अर्णब गोस्वामी, मुख्य संपादक, रिपब्लिक मीडिया नेटवर्क, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास, टीव्ही 9 भारतवर्षचे न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा, प्राग न्यूजचे संस्थापकआणि व्यवस्थापकीय संचालक संजीव नारायण, प्राइड ईस्ट एंटरटेनमेंच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिनिकी भुईया, आयटीव्ही नेटवर्कचे संस्थापक आणि प्रवर्तक कार्तिकेय शर्मा, फोर्थ डायमेंशनचे सीईओ शंकर बाला, न्यूज नेशनचे मुख्य संपादक मनोज गारोला, एमएचवनचे अध्यक्ष महेंद्र भटला, न्यूजफर्स्ट कन्नड व्यवसाय प्रमुख दिवाकर एस, एनबीएफचे सरचिटणीस आर. जयकृष्ण उपस्थित होते.
24 न्यूज, Alamai Sahara, CVR इंग्रजी, CVR हेल्थ, CVR न्यूज, DA न्यूज प्लस, DY365, गुलिस्तान न्यूज, IBC24, IND 24, इंडिया न्यूज गुजरात, इंडिया न्यूज हरियाणा, इंडिया न्यूज हिंदी, इंडिया न्यूज MPCG, इंडिया न्यूज पंजाबी, इंडिया न्यूज राजस्थान, इंडिया न्यूज UP, खबर फास्ट, MH वन, NEWS9, न्यूज फर्स्ट कन्नड़, न्यूज लाइव, न्यूज नेशन, न्यूजX, नॉर्थ ईस्ट लाइव, नॉर्थ ईस्ट न्यूज, OTV, पराग न्यूज, Puthiyathalaimurai, रिपब्लिक बांग्ला, रिपब्लिक भारत, रिपब्लिक TV, सहारा समय, समय बिहार, समय महाराष्ट्र, समय MPCG, समय राजस्थान, समय UP, TV5 कन्नड़, TV5 तेलुगु, TV9 भारतवर्ष, TV9 गुजराती, TV9 कन्नड़, TV9 मराठी, TV9 तेलुगु आणि V6 या वाहिन्यांचा समावेश एनबीएफमध्ये आहे.
इतर बातम्या:
उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत; प्रविण दरेकर म्हणतात, कशाच्या आधारावर सर्व्हे झाला?
महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले
India’s leading News Network TV9 joins India’s Largest Broadcast News Body NBF and meet Information and Broadcasting Minister Anurag Thakur