देशातील सर्वात महाग लग्न, 90 कोटींचे दागिने, मेकअपवर 30 लाख, लग्नात 500 कोटी, कोण आहे…

India’s Most Expensive Wedding | भारतातील सर्वात महाग लग्नाची चर्चा अधुनमधून होत असते. या लग्नात 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. लग्नातील वधूच्या साडीची किंमत 17 कोटी तर नेकलेस 25 कोटींचा होता.

देशातील सर्वात महाग लग्न, 90 कोटींचे दागिने, मेकअपवर 30 लाख, लग्नात 500 कोटी, कोण आहे...
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 2:35 PM

नवी दिल्ली, दि.21 जानेवारी 2024 | भारतातील सेलिब्रेटीजच्या लग्नांची चर्चा होत असते. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग नेहमी माध्यमांमध्ये असते. सेलिब्रेटीजप्रमाणे राजकीय लोकांच्या मुलांच्या लग्नाची चर्चा होत असते. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या राजशाही विवाहाची चर्चा रंगली होती. परंतु त्यापेक्षा सर्वाधिक महाग विवाह समारंभ कर्नाटकात झाला होता. 2016 मधील या विवाह समारंभाची चर्चा अजूनही होत असते. कारण या लग्नात 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. हा विवाह कर्नाटकमधील राजकीय व्यक्तीमत्व माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिचा होता.

रॉयल वेडिंगवर 500 कोटी रुपये खर्च

देशातील या रॉयल वेडिंगवर 500 कोटी रुपये खर्च झाले होते. विवाह 6 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. म्हणजेच आज त्याचा विचार केला असता किती कोटी रुपये होणार…या विवाहासोहळ्यात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. वधूचे कपडे आणि दागिन्यांवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. विवाहात 90 कोटींचे दागिने ब्राह्मणी हिला करण्यात आला होता. तित्या मेकअपवर 30 लाख रुपये खर्च झाले होते. लग्नातील साडीची किंमत 17 कोटी होती. त्याच्यावर सोन्याच्या तारांनी वर्क करण्यात आले होते. नेकलेस 25 कोटींचा होता.

विवाहसोहळा पाच दिवस

हैदराबादमधील उद्योजक विक्रम देव रेड्डी यांचा मुलगा राजीव रेड्डी याच्यासोबत ब्राह्मणी हिचा विवाह झाला. हा विवाह सोहळा पाच दिवस चालला. विवाहासाठी वधूचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला मुंबईहून बोलावण्यात आले होते. बंगलोरमधील 50 हून अधिक सुप्रसिद्ध मेकअप कलाकारांना पाहुण्यांच्या मेकअपसाठी बोलवण्यात आले होते. देश-विदेशातील 50,000 लोक या सोहळ्यास आले होते.

हे सुद्धा वाचा

पाहुण्यांसाठी 15 हेलीकॉप्‍टर अन् 1500 रुम

लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था शाही पद्धतीने केली होती. 1500 फाइव आणि थ्री स्टार हॉटेलच्या रुम बुक होते. विमानतळ ते विवाह स्थळापर्यंत पाहुण्यांना 15 हेलिकॉप्टर होते. 2000 टॅक्सी बुक होत्या. या विवाहाची चर्चा अजूनही होत असते. कारण या विवाहाच्या खर्चात हजारो सामान्य लोकांचा विवाह झाला असतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.