आता आपला देश षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसा तसे उत्तर देतोय; मोदींची ‘मन की बात’

आता आपला देश दुसऱ्या देशांच्या विचारांवर चालत नाही. कुणाच्याही दबावात नाही. आपण आपलेच संकल्प घेऊन पुढे जात आहोत. (India's resolve to win has always been strong: PM Narendra Modi )

आता आपला देश षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसा तसे उत्तर देतोय; मोदींची 'मन की बात'
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 2:42 PM

नवी दिल्ली: आता आपला देश दुसऱ्या देशांच्या विचारांवर चालत नाही. कुणाच्याही दबावात नाही. आपण आपलेच संकल्प घेऊन पुढे जात आहोत. आता भारत आपल्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. हे पाहून अभिमानही वाटत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (India’s resolve to win has always been strong: PM Narendra Modi )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून आज देशावासियांशी संवाद साधला. योगायोगाने केंद्रातील भाजपच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याने हाच धागा पकडून मोदी यांनी हे भाष्य केलं. गेल्या सात वर्षात जे काही आपण कमावलं आहे. ती देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीची देण आहे. या सात वर्षात आपण राष्ट्र गौरवाचे हे क्षण एकत्र मिळून अनुभवले आहेत. आपण आपल्याच विचाराने पुढे जात आहोत. कुणाच्याही दबावात नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आपण तडजोड करत नाही. जेव्हा आपल्या लष्कराची ताकद वाढते. तेव्हा आपण योग्य मार्गाने जात आहोत, असं वाटतं, असं मोदी म्हणाले.

देशाच्या कानाकोपऱ्यातून पत्रं

देशाच्या कानाकोपऱ्यातून मला देशावासियांचे संदेश आणि पत्रं येत असतात. 70 वर्षानंतर त्यांच्या गावात वीज पोहोचल्याबद्दल हे लोक आभार व्यक्त करत आहेत. आमच्या गावात पक्के रस्ते झाले. त्यामुळे आम्ही शहराशी जोडले गेलोत, असं अनेक लोक सांगत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

डिजिटल व्यवहार सुरू केले

या सात वर्षात देशाने डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत. जगाला नवी दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. आज कोणत्याही ठिकाणी तुम्ही चुटकीसरशी डिजिटल पेमेंट करू शकता. कोरोनाच्या संकटात त्याचा फायदाच झाला आहे. आज स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागृतता निर्माण झाली आहे. आपण रस्ते बनविण्याचा धडाकाही लावला आहे. या सात वर्षात अनेक जुने वादही संपुष्टात आले आहेत. त्यामुळे शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्वेपासून ते काश्मीरपर्यंत शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (India’s resolve to win has always been strong: PM Narendra Modi )

संबंधित बातम्या:

Lockdown: जाणून घ्या देशभरातील लॉकडाऊनची परिस्थिती, कुठली राज्यं अनलॉक होण्याची शक्यता?

अतिच झालं! खासगी रुग्णालये आणि हॉटेलांचं व्हॅक्सिनेशन पॅकेज; केंद्राचे राज्यांना कारवाईचे आदेश

Corona Cases In India | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट, कोरोनाबळीही कमी

(India’s resolve to win has always been strong: PM Narendra Modi )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.