Explain : चीन-पाकिस्तानच खरं नाही, बीजिंग किलर सेवेत दाखल, INS Arighat भारताची दुसरी अणवस्त्र पाणबुडी

INS Arighat ला हिंद महासागर क्षेत्रात तैनात करण्यात येईल. भारताला वारंवार आव्हान देणाऱ्या चीन-पाकिस्तानसाठी हा एक कठोर संदेश आहे. बीजिंग किलर K-4 मिसाइल्स आणि K-15 क्षेपणास्त्रांनी ही पाणबुडी सज्ज असेल. अणवस्त्र रिएक्टवर चालणारी ही पाणबुडी जगातील फक्त पाच देशांकडे आहे. किती घातक आहे ही पाणबुडी समजून घ्या.

Explain : चीन-पाकिस्तानच खरं नाही, बीजिंग किलर सेवेत दाखल, INS Arighat भारताची दुसरी अणवस्त्र पाणबुडी
Submarine
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 9:49 AM

देशाची दुसरी अणवस्त्र सज्ज पाणबुडी INS Arighat सेवेत दाखल झाली आहे. INS अरिघातमुळे भारताची हिंद महासागर क्षेत्रातील समुद्र शक्ती कैकपटीने वाढवणार आहे. ही पाणबुडी बीजिंग किलर मिसाइलने सुसज्ज आहे. या पाणबुडीमुळे हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अणवस्त्र हल्ला करण्याची भारताची क्षमता आणखी बळकट झाली आहे. चीन-पाकिस्तानसाठी ही पाणबुडी म्हणजे एक संदेशच आहे. आता हवा, जमिनीवरच्या युद्धातच नव्हे, तर भारताच्या समुद्र शक्तीशी टक्कर घेणं सुद्धा शत्रुला परवडणार नाही. या पाणबुडीला एसएसबीएन श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. ही पाणबुडी भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचा भाग असेल. ही पूर्णपणे अणू इंधनावर चालणारी पाणबुडी आहे. आतापर्यंत भारताकडे INS Arihant च्या रुपायने फक्त एक पाणबुडी होती. 2016 मध्ये नौदलात ही पाणबुडी दाखल झालेली. INS अरिघात हे INS अरहिंतच पुढच अत्याधुनिक वर्जन आहे.

INS अरिघातला हिंद महासागर क्षेत्रात तैनात करण्यात येईल. या सागरी क्षेत्रात चीनचा वावर वाढला आहे. वर्चस्व मिळवण्याचा चीनचा प्रयत्न रोखणं हा यामागे उद्देश आहे. INS अरिघातमध्ये INS अरिहंतपेक्षा जास्त चार लॉन्च ट्यूब आहेत. म्हणजे INS अरिघातमधून ‘बीजिंग किलर’ K-4 SLBM अणवस्त्र क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात. या क्षेपणास्त्रांची रेंज 3500 किमी पेक्षा जास्त आहे. पाकिस्तान आणि चीन हे देश रडारवर असतील. त्याशिवाय या पाणबुडीत बारा K-15 मिसाइल तैनात करता येतील. यांची रेंज 750 किमी आहे. त्याशिवाय यामध्ये टॉरपीडो असतील. शत्रुच्या पाणबुडीला जाळ्यात अडकवून उद्धवस्त करण्याची क्षमता INS अरिघातमध्ये आहे.

भारताच K-15 मिसाइल किती घातक?

INS अरिघातमध्ये प्रामुख्याने K-4 क्षेपणास्त्र तैनात केली जातील. ही पाणबुडीतून लॉन्च होणारी मिसाइलस आहेत. DRDO ने ही मिसाइल बनवली आहेत. 3500 ते 4000 किमी या क्षेपणास्त्रांची रेंज आहे. अणवस्त्र हल्ल्यासाठीच ही क्षेपणास्त्र बनवण्यात आली आहेत. नॉर्मल वॉर हेड सुद्धा ही क्षेपणास्त्र वाहून नेतील. बीजिंग किलर नावाने ही क्षेपणास्त्र ओळखली जातात. K-15 हे DRDO ने विकसित केलेलं बॅलेस्टिक मिसाइल आहे. त्याची रेंज 750 ते 1000 किमी आहे.

टॉरपीडो म्हणजे काय?

INS अरिघातवर 6 टॉरपीडो असतील. टॉरपीडो म्हणजे पाण्यातला बॉम्ब. टॉरपीडोने हल्ले करुन शत्रुची पाणबुडी किंवा जहाज बुडवता येऊ शकतं. टॉरपीडोची रेंज 40 किमी असते. प्रतितास 50 किमी वेगाने टार्गेटवर प्रहार करतं. शत्रुची पाणबुडी, युद्धनौकांना जाळण्यात अडकवून संपवण्यासाठी समुद्री सुरुंग पेरली जातात. त्यासाठी टॉरपीडोचा वापर होतो.

इलेक्ट्रिक पाणबुडी आणि अणवस्त्र पाणबुडीतला फरक काय?

INS अरिघात अणू इंधनावर चालणारी पाणबुडी आहे. बराच काळ ती पाण्याध्ये राहू शकते. हलका दाब असलेल्या अणवस्त्र रिएक्टरवर इंजिन चालतं. म्हणजे अनेक महिने ही पाणबुडी समुद्राखाली राहू शकते. डीजेल आणि इलेक्ट्रिक पाणबुडीबद्दल बोलायच झाल्यास तर या सबमरीनना बॅटरी रिचार्ज करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता पडते. त्यामुळे दर दोन दिवसात एकदा त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर यावं लागतं.

K-15 Missile

INS अरिघात किती खोल पाण्यात जाऊ शकते?

INS अरिघात 1000 ते 1400 फुट खोल पाण्यात जाऊ शकते. याच वजन 6 हजार टन आहे. लांबी 113 मीटर आहे. विशाखापट्टनम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये ही पाणबुडी बनवण्यात आली आहे. INS अरिघात पाण्याच्या पुष्ठभागावर 12 से 14 नॉट्स म्हणजे 22 ते 30 किमी प्रति तास वेगाने चालते. तेच पाण्याच्या आत दुप्पट म्हणजे 24 नॉट्स म्हणजे 44 किमी प्रतितास वेगाने चालते.

कुठल्या पाच देशांकडे अशी सबमरीन

INS अरिघात उन्नत श्रेणी सबमरीन आहे. एडवांस्ड टेक्नोलॉजी वेसल ATV प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आली आहे. अशा प्रकारची सबमरीन जगातील फक्त पाच देशांकडे आहे. भारत या यादीत सहावा देश आहे. भारताच्या आधी फ्रान्स, ब्रिटन, चीन, रशिया आणि अमेरिका हे देश आहेत. अणवस्त्र पाणबुडीमुळे कुठल्याही देशाकडे पाण्याखालून अणवस्त्र हल्ला करण्याचा पर्याय असतो. अणवस्त्राच्या बाबतीत नो फर्स्ट यूज भारताच धोरण आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.