चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारताची ताकद किती, पाहा कोणाकडे किती सैन्य?
Indian Army : जगात अनेक देशांकडे मोठं सैन्य आहे. आपल्या रक्षणासाठी सर्वच देशांच्या सैन्य आणि युद्ध सामग्रीवर मोठा खर्च करावा लागतो. गेल्या काही दिवसात भारताची तादक वाढली आहे. भारताकडे अनेक अत्याधुनिक विमाने आणि युद्ध सामग्री आली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारताची ताकद किती आहे जाणून घ्या.
Most Powerfull army : जगात असे अनेक देश आहेत जे एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे त्यांना आपली ताकद वाढवण्याची गरज भासते. सध्या जगात अनेक देशांमध्ये युद्धाचे संकट आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन मध्ये देखील ऑक्टोबर २०२३ पासून संघर्ष सुरु आहे. आता इराण आणि पाकिस्तानमध्ये देखील तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. या तणावाचे युद्धात कधी रूपांतर होईल हे सांगता येत नाही. दरम्यान ग्लोबल फायर पॉवरने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची यादी जाहीर केली आहे.
अमेरिकेचे सैन्य जगात सर्वात शक्तिशाली असल्याचं या अहवालात पुढे आलं आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर रशिया आहे. तिसऱ्या स्थानावर चीन आणि चौथ्या स्थानावर भारत आहे. पाचव्या स्थानावर दक्षिण कोरिया आहे. या यादीत ब्रिटन हा देश सहाव्या, जपान सातव्या, तुर्की आठव्या, पाकिस्तान नवव्या आणि इटली दहाव्या स्थानावर आहे. आता जर आपण भारताच्या सैन्याची चीन आणि पाकिस्तानच्या सैन्याशी तुलना केली तर भारत किती शक्तीशाली आहे हे पाहुयात.
कोणाकडे किती सैनिक
चीनकडे 20.35 लाख सैनिक
भारताकडे 14.55 लाख सैनिक
पाकिस्तानकडे 6.54 लाख सैनिक
कोणाकडे किती लष्करी विमाने
चीनकडे 3,304 विमाने आहेत.
भारताकडे 2,296 विमाने आहेत.
पाकिस्तानकडे 1,434 विमाने आहेत
कोणाकडे किती रणगाडे
चीनकडे 5000 रणगाडे आहेत.
भारताकडे 4614 रणगाडे आहेत.
पाकिस्तानकडे 3742 रणगाडे आहेत.
हवाई दलात किती सैनिक
भारतीय हवाई दलात 310,575 सैनिक आहेत
चीनच्या हवाई दलात 400,000 सैनिक आहेत
नौदलात किती सैनिक
चीनच्या नौदलात 380,000 सैनिक आहेत.
भारतीय नौदलात 142,252 सैनिक आहेत.
याशिवाय प्रत्येक देशाला किती देशांचा पाठिंबा मिळतो हे देखील महत्त्वाचे आहे. चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारताला सर्वाधिक देशांचा पाठिंबा मिळू शकतो. चीनच्या विरोधात असलेलं जगातील सर्वात ताकदवर अमेरिकेचे सैन्य भारताच्या बाजुने उभा राहू शकतो. या शिवाय जपान आणि रशिया सारखा देश ही भारताच्या बाजुने उभा राहू शकतो. भारताचा सर्वात जवळचा मित्र देश इस्राईल नेहमीच भारतासाठी धावून येतो.