Aditya L1 launch | आदित्यला स्थापित करण्यासाठी सूर्याजवळचा लॅग्रेज पॉइंटच का निवडला?
Aditya L1 launch | सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती मिनिट लागतात?. सूर्यावरच्या वादळांची माहिती मिळेल. यामुळे अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांच नुकसान होतं. भारताने एकप्रकारे आपली वेधशाळाच सूर्यावर पाठवलीय.
बंगळुरु : भारताने पहिलं सूर्य मिशन आज 2 सप्टेंबरला लॉन्च केलं. आदित्य L1 सॅटलाइट आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघालय. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये आदित्य L1 ला स्थापित केलं जाईल. तिथून आरामात या यानाला सूर्याभोवती भ्रमण करता येईल. आदित्य एल 1 ला सूर्याच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी चार महिने लागणार आहेत. हे खास मिशन आहे, याचा फायदा फक्त भारतालाच नाही, तर जगाला होईल, हे मिशन देवदूत ठरेल. या मिशनमुळे संपूर्ण जगाला स्पेस प्लानिंगमध्ये मदत होईल. आदित्य L1 सूर्याच ऑब्जर्वेटरी मिशन आहे. एकप्रकारे भारताची सूर्याजवळची वेधशाळा आहे. सूर्याच्या आसपास होणाऱ्या बदलांच निरीक्षण केलं जाईल. आदित्य L1 सॅटलाइटला सूर्य-पृथ्वी सिस्टिममध्ये पाच लॅग्रेज पॉइंट्स आहेत. यात एका लॅग्रेज पॉइंट्मध्ये स्थापित करण्याच टार्गेट आहे.
या सॅटलाइटच्या माध्यमातून फोटोस्फेयर म्हणजे सूर्याचा पृथ्वीवरुन दिसणारा भाग, क्रोमोस्फेयर म्हणजे फोटोस्फेयरच्या वर सूर्याचा दिसणारा भाग, कोरोना म्हणजे सूर्याचे काही हजार किलोमीटर पर्यंत पसरलेले थर आणि सूर्याची मॅग्नेटिक फील्ड, टोपोलॉजी आणि अवकाश हवामानाचा अभ्यास केला जाईल. आदित्य L1 आपल्यासोबत सात पेलोड घेऊन देला आहे. यात तीन पेलोड्स वेगवेगळ्या उद्देशाने सूर्यावर नजर ठेवतील. चार अन्य पेलोड्स लॅग्रेज पॉइंट-1 वरील कण आणि आसपासच्या क्षेत्राचा अभ्यास करतील. या पेलोड्समुळे अवकाशातील वातावरण, हवामानासंबंधी माहिती मिळेल. सूर्यावरच्या वादळांची माहिती मिळेल. यामुळे अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांच नुकसान होतं. सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती मिनिट लागतात?
पृथ्वीपासून सूर्य जवळपास 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सौर मंडळातील हा सर्वात मोठा तारा आहे. सूर्यपासून जो प्रकाश येतो, तो पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिट लागतात. लॅग्रेज पॉइंट-1 महत्त्वाचा यासाठी आहे कारण, इथून ग्रहणाचा सूर्यावर प्रभाव पडत नाही. म्हणजे कुठल्याही ग्रहण काळाशिवाय सूर्याला पाहता येणार आहे. याच लॅग्रेज पॉइंट-1 मध्ये आदित्य एल-1 ला स्थापित केलं जाईल. पृथ्वीपासून हे अंतर 15 लाख किलोमीटरवर आहे. या सगळ्याची माहिती आपल्याला आदित्य एल 1 मिशनच्या माध्यमातून मिळेल.