प्रसिद्ध उद्योगपतीचा भीषण अपघात, 10 कोटींच्या रॉल्स रॉयसचा चक्काचूर; दृश्य पाहून सर्वच हादरले

हरयाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसिद्ध उद्योगपती विकास मालू जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे.

प्रसिद्ध उद्योगपतीचा भीषण अपघात, 10 कोटींच्या रॉल्स रॉयसचा चक्काचूर; दृश्य पाहून सर्वच हादरले
Vikas MaluImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 3:18 PM

चंदीगड | 26 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध उद्योगपती विकास मालू यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने मालू बचावले असून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हरयाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. विकास मालू हे रॉल्स रॉयस या 10 कोटीच्या कारमधून चालले होते. 200च्या स्पीडने त्यांची कार चालली होती. या कारने टँकरला जोरदार धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला आहे. विकास मालू हे अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे मित्र आहेत. कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात त्यांचं नाव आलं होतं.

कारमधून विकास मालू यांच्यासहीत चार लोक चालले होते. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मालू यांच्यासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मालू यांच्या पार्श्वभागाला मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात येत असून सोमवारी त्यांचं ऑपरेशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मालू हे कुबेर ग्रुपचे मालक आहेत.

हे सुद्धा वाचा

10 कोटींची कार

मालू यांच्या रोल्स रॉयल फँटम कारची किंमत 10 कोटी आहे. राजस्थानच्या जयपूर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते चालले होते. त्यांनी ताशी 200 किलोमीटरच्या स्पीडने कार चालवली होती. दरम्यान, ही दुर्घटना कधी घडली हे माहीत नाही. पण त्यांच्या अपघाताचे फोटो 23 ऑग्सट रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओही शेअर झाले आहेत. 23 ऑगस्ट रोजी त्यांचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. तर काहींच्या मते त्यांच्या अपघात 25 ऑगस्ट रोजी झाला असावा असं सांगितलं जातं आहे.

टँकरमधील प्रवासीही जखमी

या अपघातात रामप्रीत आणि कुलदीप नावाच्या दोन इसमांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही टँकरमध्ये होते. टँकरमधील गौतम नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नूंह येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर कारमधून जात असलेले कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू, दिव्या आणि तसबीर असे तिघे जखमी झाले आहेत. विकास मालू यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.