जगभरात भाववाढीचा आगडोंब : भारतीयांच्या खिशावर भार, महागाईने अमेरिका-ब्रिटनसह उर्वरित देशही धास्तावले
जगभरात भाववाढीचा आगडोंब उसळला आहे. महागाईचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर जगभरातील देशांवर होत आहे. देशातील महागाईने 17 महिन्यांतील उच्चांक गाठला असतानाच अमेरिकेत ही हीच परिस्थिती आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या ग्रेट ब्रिटन आणि युरोपचे प्रतिनिधित्व करणा-या जर्मनीतही परिस्थिती फारशी चांगली नाही. या देशांनाही महागाईने चित केले आहे.
जगभरात भाववाढीचा आगडोंब उसळला आहे. महागाईचा (Inflation) परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर जगभरातील देशांवर होत आहे. देशातील महागाईने 17 महिन्यांतील उच्चांक (Highest Level) गाठला असतानाच अमेरिकेत ही हीच परिस्थिती आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या ग्रेट ब्रिटन आणि युरोपचे प्रतिनिधित्व करणा-या जर्मनीतही परिस्थिती फारशी चांगली नाही. या देशांनाही महागाईने चित केले आहे. 2022 हे वर्ष सगळ्याच अर्थव्यवस्थांसाठी आव्हानात्मक, संकटाचे आणि वाईट सिद्ध झाले आहे. सरत्या वर्षातही महागाईची झळ बसली होती. मात्र यंदा उन्हाने जशी सर्वसामान्यांची लाही-लाही होत आहे, तशीच महागाईच्या चटक्याने सर्वसामान्य माणूस होरपळला आहे. मार्च 2022 मध्ये देशातील किरकोळ महागाईने 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली. त्यात 6.95 टक्के दराने वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine Crisis) सुरू असलेल्या युद्धाचा इतका परिणाम झाला की, भारतासह जगात स्वयंपाकघरापासून ते दैनंदिन व्यवहारांपर्यंत सर्वसामान्य माणूस महागाईत भरडला गेला आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूपासून अॅल्युमिनिअम, पॅलेडियम, निकेल, पोटॅश, तर गहू, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंमध्येही 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पाश्चात जगाला अनेक दशकांनंतर झळ
जगभरात ज्या पद्धतीने महागाई वाढली आहे, ती पाश्चिमात्य देशांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. एका अहवालानुसार पाश्चिमात्य देशांनी दशकांनंतर अशा महागाईचा अनुभव घेतला आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये त्यात कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळाले आहे. तेल आणि धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. 2020 मध्ये कोविड काळात ही महागाई एवढी वाढली नव्हती. तर 2021 मध्ये भाववाढीत काही चढ-उतार आले आणि 2022 मध्ये अचानक या वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या.
पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम
सरत्या वर्षात कोरोनामुळे निर्बंध लादल्या गेले. त्याचा परिणाम थेट पुरवठ्यावर झाला. पुरवठा साखळी खंडित झाली. ज्याचा थेट परिणाम किंमतींवर झाला होता. या प्रभावातून जागतिक अर्थव्यवस्था बाहेर पडत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली. युद्ध सुरू होताच जगभरातील गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला आणि जगभरातील शेअर बाजार कोसळले. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या.
भारतात किरकोळ महागाई 6.95 टक्क्यांवर
मार्च 2022 मध्ये देशातील किरकोळ महागाईने 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठलीआहे . त्यात 6.95 टक्के दराने वाढ झाली. यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 7.61 टक्के दराने वाढला होता. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 6.07 टक्के होता. मार्चमध्ये अन्नधान्याच्या किंमती 7.47 टक्क्यांनी वाढल्या. कपडे आणि पादत्राणांच्या भावात 9.40 टक्क्यांनी वाढ झाली, तर इंधन आणि विजेच्या दरात 7.52 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचबरोबर अन्य गोष्टींवरही महागाई वर्षागणिक 7.02 टक्के दराने तर घरांच्या किमतीत 3.38 टक्के इतकी वाढ झाली आहे. देशातील खाद्यतेलांवरील महागाई 18.79 टक्क्यांनी वाढली आहे, तर भाज्यांवरील महागाई 11.64 टक्क्यांनी वाढली आहे.
इतर बातम्या-