देशात आजानविरोधात हनुमान चालिसाचा पाठ सुरू; मात्र वाराणसीत महंगाई डायन खायचा राग
नवी दिल्ली : आपल्या देशात सध्या राजकीय वातावरण हनुमान चालिसावरून तंग आहे. मशिदीवरील (mosque) भोंग्याविरोधात मोठ्याप्रमाणात आवाज उठविण्यात येत आहे. अख्या देशात मशिंदीच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालिसाचा पाठ केले गेले. त्यामुळे आपल्या देशात राजकारणात देवही सुटू शकत नाहीत हेच दिसत आहे. त्यातच देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी जहाँगीरपुरी भागात मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीत […]
नवी दिल्ली : आपल्या देशात सध्या राजकीय वातावरण हनुमान चालिसावरून तंग आहे. मशिदीवरील (mosque) भोंग्याविरोधात मोठ्याप्रमाणात आवाज उठविण्यात येत आहे. अख्या देशात मशिंदीच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालिसाचा पाठ केले गेले. त्यामुळे आपल्या देशात राजकारणात देवही सुटू शकत नाहीत हेच दिसत आहे. त्यातच देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी जहाँगीरपुरी भागात मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीत दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधत विटा आणि दगडांचा मारा करण्यात. यानंतर देशभरातून हिंसक घटना घडल्याच्या बातम्या येत होत्या. अनेक शहरांमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण केले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) यांच्यात वेगळीच गदारोळ सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच मशिदीबाहेरच्या स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याची धमकी दिली होती. राज्य सरकारने ३ मे पूर्वी मशिदींतील लाऊडस्पीकर (Loudspeaker) न काढल्यास त्यांचे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवतील, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. असेच काहीसे चित्र देशाच्या इतर भागात ही आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये सध्या धार्मिक भोंग्याविरोधात महंगाई डायन खाय जात हैं” चा व्हिडिओ गाजत आहे.
अजान विरुद्ध हनुमान चालीसा
अजान विरुद्ध हनुमान चालीसा यूपीच्या अनेक भागात सातत्याने सुरू आहे. वाराणसी आणि अलीगढसारख्या भागात अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली जात आहे. त्याचवेळी देशातील राजकारण हे समाजकारण, विकासाची दिशा सोडून भलतीकडेच जात असल्याचे दिसत आहे. देशाला धार्मिक तुकड्यांमध्ये लोटण्याचेच काम सध्या सुरू आहे. अशातच आता अखिलेश यादव यांचा एक व्हिडीओ आणि सोशल मिडियात एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. त्या व्हायरल व्हिडिओला कॅप्शन देत लोकांशी शेअर केले आहे. त्यात “सखी सैयां तो खूबई कमात हैं, महंगाई डायन खाय जात हैं” म्हटले आहे. त्यामुळे देशात धार्मिक प्रश्नांपेक्षा इतर प्रश्न हे महत्वाचे असून त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजवादी’ मुद्दों का लाउडस्पीकर बजवाएंगे… महंगाई, बेरोज़गारी, अपराध के ख़िलाफ आवाज़ उठाएंगे! pic.twitter.com/i13Ok83IZy
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 17, 2022
खिलेश यादव यांचा व्हायरल व्हिडिओ
वाराणसी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या निषेधार्थ हनुमान चालिसाच्या पठणावरून झालेल्या वादानंतर आता महंगाई डायन खाय जात हैं” ची जादू पहायला मिळत आहे. अखिलेश यादव यांनी अशाच एका व्हायरल व्हिडिओला कॅप्शन देत लोकांशी शेअर केले आहे. अखिलेश यांनी सार्वजनिक केलेला व्हिडिओ वाराणसीतील समाजवादी नेते रविकांत विश्वकर्मा यांचा आहे. यामध्ये सपा नेते सांगत आहेत की, आज देशात शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि सुरक्षेचा प्रश्न आहे. लाऊडस्पीकरवर वाजणारी अजान आणि आरती हा मुद्दा नाही. “काही लोकांना लाऊडस्पीकरच्या नावाखाली या मुद्द्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आम्ही समाजवादी त्यांना तसे करू देणार नाही. आम्ही आमच्या घराच्या छतावर लाऊडस्पीकर लावले आहेत. ज्यामध्ये लोक महागाईवर गाणे वाजवत आहेत. “सखी सैयां तो खूबई कमात हैं, महंगाई डायन खाय जात हैं” सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ शेअर करत ‘समाजवादी’ मुद्द्यांवर लाऊडस्पीकर वाजवला जाईल, असे लिहिले आहे. महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीविरोधात आवाज उठवणार! असल्याचेही म्हटले आहे.
क्या सही आइडिया है!
बनारस में मस्जिदों के लाउड स्पीकर से अजान की आवाज़ आ रही है। मंदिरों के लाउड स्पीकर से हनुमान चालीसा की। इन सबको मूल मुद्दों पर लाने के लिए सपा वालों के लाउड स्पीकर से ‘महंगाई डायन’ की आवाज आ रही है। ऐसा हर जगह किया जाना चाहिए।
— Shyam Meera Singh (@ShyamMeeraSingh) April 17, 2022
सपा वाले त्यांच्या भोंग्यावर महागाईचा राग
तसेच त्यांचा हा मॅसेज सोशल मिडीयावर चांगलाच व्हारल होताना दिसत असून लोक ही तो फॉरवर्ड करताना दिसत आहेत. त्यात एका युवकाने म्हटले आहे. काय चांगला पर्याय आहे. वारानशीच्या मशिंदीवरील भोंग्यातून आजानची आवाज येत आहे. तर मंदिरातूनही हनुमान चालीसा म्हटली जात आहे. यासगळ्यात देशाच्या आणि उत्तरप्रदेशच्या जनतेला भानावर आणण्यासाठी सपा वाले त्यांच्या भोंग्यावर महागाईचा राग लावत आहेत. हा चांगला उपाय आहे. आपल्या प्रश्नांना बगल न देता ते कायम लक्षात राहतील.
काय म्हटलं आहे युवकानं
क्या सही आइडिया है!
बनारस में मस्जिदों के लाउड स्पीकर से अजान की आवाज़ आ रही है। मंदिरों के लाउड स्पीकर से हनुमान चालीसा की। इन सबको मूल मुद्दों पर लाने के लिए सपा वालों के लाउड स्पीकर से ‘महंगाई डायन’ की आवाज आ रही है। ऐसा हर जगह किया जाना चाहिए।