International Workers Day : 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून का साजरा होतो?, जाणून घ्या कारण आणि महत्व
भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वर्तीनं 1 मे 1923 रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामदार दिनाचं प्रतिक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा वापरण्यात आला होता. मात्र, 1989 मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामदार दिन म्हणून मान्यता मिळाली.
मुंबई : दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) म्हणूनही साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र (Maharashtra) राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनता हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करते. तर दुसरीकडे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या (Labor Kisan Party of Hindustan) वर्तीनं 1 मे 1923 रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामदार दिनाचं प्रतिक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा वापरण्यात आला होता. मात्र, 1989 मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामदार दिन म्हणून मान्यता मिळाली.
कामगार दिनाचा इतिहास
मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी 1989 मध्ये ठराव मंजूर केला. ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. पूर्वी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. याचा निषेध म्हणून, त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली.
भारतात चेन्नईमध्ये 1923 मध्ये पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला. लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने हा दिवस साजरा केला. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनीही सरकारला सांगितले की, कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा. हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन
कम्युनिस्ट आणि समाजवादी राजकीय पक्षांच्या कामगार चळवळींशी हा दिवस जोडला गेलाय. कामगार दिनाला आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन, मराठीत कामगार दिवस आणि तमिळमध्ये उझीपल्लार नाल म्हणून ओळखलं जातं. तसंच 1960 साली भाषेच्या आधारावर गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमा ठरवल्या जाऊन ही दोन राज्ये स्वतंत्र झाली. तो दिवसही 1 मे असल्यामुळे हा दिवस गुजरात दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणूनही ओळखला जातो.