काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

शेतकरी आंदोलनाला 60 दिवस पूर्ण होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यातच 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. ('Invisible force' derailing talks, doesn't want farmers' agitation to end')

काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 5:46 PM

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला 60 दिवस पूर्ण होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यातच 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तर कोणती तर काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याचा दावा केला. मात्र, ही अदृश्य शक्ती कोणती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. (‘Invisible force’ derailing talks, doesn’t want farmers’ agitation to end’)

शेतकरी आंदोलनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्रसिंह तोमर यांनी मीडियाशी संवाद साधून हा आरोप केला. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. त्यांनाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू नये असं वाटतं. नाही तर आमच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांनी वेगळाच राग अळवला नसता, असा दावा तोमर यांनी केला.

शेतकऱ्याशी चर्चा करण्यास तयार

शेतकऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने नोटीस बजावली आहे. त्यावर तोमर यांना पत्रकारांनी छेडले असता कोणत्याही गोष्टीचा शेतकरी आंदोलनाशी संबंध लावू नका, असं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. जेव्हा पंजाबमध्ये शेतकरी रेल्वेरुळावर उतरून आंदोलन करत होते, तेव्हापासूनच त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला कोणतीही ठेच पोहोचणार नाही, याची आम्ही काळजी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

आंदोलनासाठी 365 दिवस आहेत

26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे. आंदोलनासाठी 365 दिवस पडले आहेत. शेतकरी त्यांच्या रॅलीची ताकद कधीही दाखवू शकतात. त्यामुळे 26 जानेवारी रोजी त्यांनी रॅली काढणं योग्य नाही. शेतकऱ्यांनी इतर कुठल्या तरी दिवशी रॅलीचं आयोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला रॅलीचं आयोजन केलं तरी या आंदोलनात शिस्त पाळली जाईल, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकारला कोणताही ईगो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (‘Invisible force’ derailing talks, doesn’t want farmers’ agitation to end’)

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांचा आसूड कडाडला; शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ नाशिकवरून मुंबईकडे

‘काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळातील विनाशकारी नितीमुळेच शेतकरी गरीब’, जावडेकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?

(‘Invisible force’ derailing talks, doesn’t want farmers’ agitation to end’)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.