IPS अधिकाऱ्यांनाही प्रश्न पडला, कोव्हिशिल्ड की कोवॅक्सीन, कोणती लस चांगली?
जगभरात कोरोना लस घ्यावी की नाही इथपासून कोणती लस चांगली असे अनेक प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहेत.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना लस घ्यावी की नाही इथपासून कोणती लस चांगली असे अनेक प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहेत. मात्र, आता भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील हेच प्रश्न पडल्याचं समोर आलंय. कोविड-19 लसीविषयी (Covid-19 Vaccine) IPS (सेंट्रल) असोसिएशनने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एक बैठक आयोजित केली. यावेळी आयपीएस अधिकाऱ्यांनी कोरोना लसीविषयीचे आपल्या मनातील प्रश्न विचारले. या प्रश्नांना बैठकीला उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी उत्तरं दिली. वरिष्ठ IPS अधिकारी आदित्य मिश्रा यांनी या बैठकीचा समन्वय साधला (IPS officer ask Which corona vaccine is good Covishield or Covaccine).
आयपीएस अधिकाऱ्यांची नेमकी काळजी काय?
युरोपमध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लस (Oxford-astraZeneca vaccine) घेतल्यानंतर काही रुग्णांच्या रक्तात गुठळ्या तयार झाल्याची उदाहरणं समोर आली होती. यावरच अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला. मात्र, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपप्रमाणे भारतात अद्याप असा कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही.
राष्ट्रीय टास्क फोर्सचे (National task force) प्रमुख डॉ. एन. केय अरोरा म्हणाले, “एस्ट्राजेनेकाची लस पुण्यात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये (SII) तयार होते. भारतात ही लस कोविशिल्ड या नावाने ओळखली जाते. दुसरीकडे भारतातील बायोटेक कंपनीकडून उत्पादन करणाऱ्या लसीचं नाव कोवॅक्सिन असं आहे. याबाबतचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) पाठवला आहे. शिवाय बहुतांश युरोपीय देशांमध्येही लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरु झालाय.
भारतात लसीकरणात किती लोकांवर दुष्परिणाम?
“प्रत्येकी 10 हजार लोकांना लसीकरण दिल्यानंतर त्यातील केवळ 40 लोकांनाच ताप, सुज किंवा दुखण्याचा त्रास होतो. बहुतांशी लोकांना लसीकरणानंतर कोणताही त्रास जाणवलेला नाही. त्रास होणाऱ्या लोकांचं प्रमाण केवळ 0.05 टक्के आहे.
कोणती लस अधिक प्रभावी?
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, दोन्ही लसी या सारख्याच प्रमाणात प्रभावी आहेत. दोन्ही लसी शरीरातील अँटीबॉडीचं प्रमाण वाढवतात.”
लसीचा प्रभाव किती?
डॉ. गुलेरिया म्हणाले, “या कोरोना लसीमुळे नागरिकांना कमीत कमी 8 महिने किंवा 1 वर्षापर्यंत संसर्गापासून संरक्षण मिळेल. हे संरक्षण अधिक काळही टिकू शकेल, मात्र ते कोरोना विषाणू कसा वागतो यावरच अवलंबून असेल.” कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी 30 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होऊ शकत नाही. त्यांना लस मिळाली तर त्यांना अँटीबॉडी तयार करण्यात मदत होईल, असं मत डॉ अरोरा यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा :
दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन
भारतानं कोविडचे डोस रोखल्याचा इंग्लंडचा आरोप, सिरमनं आरोप फेटाळले, वाचा काय घडतं आहे?
व्हिडीओ पाहा :
IPS officer ask Which corona vaccine is good Covishield or Covaccine