Shivdeep Lande: राजीनाम्यानंतर IPS शिवदीप लांडे यांच्यावर सरकारचा मोठा डाव, अचानक दिली मोठी जबाबदारी

Bihar IPS Shivdeep Lande Transfer: शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वसामान्यमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत बिहार सरकारने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता शिवदीप लांडे काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.

Shivdeep Lande: राजीनाम्यानंतर IPS शिवदीप लांडे यांच्यावर सरकारचा मोठा डाव, अचानक दिली मोठी जबाबदारी
Shivdeep Lande
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 9:46 AM

Bihar IPS Shivdeep Lande Transfer: महाराष्ट्रातील रहिवाशी शिवदीप लांडे बिहारमधील सिंघम म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. सोशल मीडियाद्वारे त्यांनी त्याची माहिती दिली होती. राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांच्याकडून धमाकेदार कामगिरी सुरु आहे. त्यांनी तनिष्क शोरुम प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने न केल्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. सरकारने त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला नाही. त्याच वेळी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) म्हणून पटण्यात बदली केली आहे.

सिंघम म्हणून प्रसिद्ध

शिवदीप लांडे बिहारमध्ये ‘सुपरकॉप’ आणि ‘सिंघम’ नावाने ओळखले जातात. त्यांच्या राजीनाम्याची बातमी समजल्यावर संपूर्ण बिहारमध्ये धक्का बसला. त्यांना आदर्श मानणारे अनेक युवकांमध्ये महाराष्ट्रातील युवक आहेत. ते महाराष्ट्रातील युवकांच्या नेहमी मार्गदर्शन आणि मदतही करत असतात. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यात झाला आहे. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पूर्णिमा येथील पटणा येथे बदली करण्यात आली आहे. शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

केवळ 33 दिवसांत बदली

केवळ 33 दिवसांत त्यांची पुन्हा बदली झाली आहे. त्यांनी 6 सप्टेंबर रोजी पूर्णिमाचे आयजी म्हणून कार्यभार घेतला होता. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. मुझफ्फरपूरमधील भूमाफियावर केलेल्या कारवाईमुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता.

हे सुद्धा वाचा

बिहार सरकारकडून मोठी जबाबदारी

शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वसामान्यमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत बिहार सरकारने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता शिवदीप लांडे काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे. 19 सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे बिहारमध्येच राहणार असल्याचे म्हटले होते. ते राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.