नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्या लाटेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. तिकीट बुकिंगदरम्यान रोख रक्कम भरण्यासाठी रेल्वेने तिकिटात सूट जाहीर केलीय. आता UPI च्या माध्यमातून पीआरएस काऊंटरवर आरक्षित तिकीट बुकिंगच्या रकमेवर 5 टक्के सूट मिळू शकेल. ऑनलाईन आरक्षित तिकिटांच्या बुकिंगसाठी यापूर्वी 5 टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. पण आता UPI मार्फत रेल्वे काऊंटरवर तिकीट बुकिंगच्या पेमेंटमध्येही सूट मिळणार आहे. (Irctc Ticket Booking Indian Railways Get 5 Percent Discount On Train Ticket)
पुढील वर्षाच्या 12 जूनपर्यंत प्रवासी UPI च्या रकमेवर 5% सवलतीच्या सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असतील. कोरोना संक्रमणाच्या वेळी प्रवाशांना रोखीची रक्कम टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय. UPI द्वारे पेमेंट केल्यास प्रवाशांना पीएनआरवर सूट मिळणार आहे.
भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्यात. रेल्वेने पाच जोड्यांच्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यात. त्याच वेळी तिकीट असलेले रेल्वे प्रवासी या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करण्यास सक्षम असतील. प्रवासासाठी नियोजित प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान गंतव्यस्थानावर COVID 19 साथीचे असलेले सर्व नियम आणि एसओपीचे अनुसरण करण्याची विनंती झोनल रेल्वेने केलीय. इतर तपशीलांसह विस्तारीत प्रवासासह असलेल्या विशेष गाड्यांची यादी येथे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. कोरोनाच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्या प्रत्येकाला ते लागू असणार आहेत.
संबंधित बातम्या
वर्ष 2020-21 अर्थव्यवस्थेसाठी ‘गडद’, चुका स्वीकारा आणि विरोधकांचं ऐकाः पी चिदंबरम
Bank Holiday List | जून महिन्यात 9 दिवस बँका बंद, पाहा पूर्ण यादी
irctc ticket booking indian railways get 5 percent discount on train ticket