तपास यंत्रणामागे लागताच रॉबर्ट वाड्रांना राजकारणाचे वेध; प्रियांकांच्या निर्णयाकडे लक्ष

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. (is Priyanka Gandhi Denying Robert Vadra's Entry Into Politics And Why)

तपास यंत्रणामागे लागताच रॉबर्ट वाड्रांना राजकारणाचे वेध; प्रियांकांच्या निर्णयाकडे लक्ष
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 12:50 PM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे वाड्रा यांनी आता पुन्हा एकदा राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, प्रियांका गांधी त्यांना राजकारणात येऊ देईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (is Priyanka Gandhi Denying Robert Vadra’s Entry Into Politics And Why)

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्याशिवाय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडूनही त्यांची आधीच चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाड्रा यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देशाची सेवा करता करता शहीद झालेल्या कुटुंबातून मी आलोय. मी देशातील अनेक भागात राहिलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं दुष्प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी संसदेत जाणं हे महत्त्वाचं आहे, असं वाड्रा यांनी सांगितलं.

मी प्रदीर्घ काळ बाहेरची लढाई लढली आहे. परंतु, तरीही मला वारंवार त्रास दिला जात आहे. मी राजकारणात नसल्यानेच असं होत आहे, असं सांगतानाच आता राजकारणात प्रवेश करण्याचा मी योग्य वेळीच निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. लोकांनी मला स्वीकारलं पाहिजे. मला मतदान केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मी काही करू शकेन, असा मतदारसंघ मी शोधणार आहे. विशेषत: माझ्या कुटुंबीयांनाही माझ्या राजकारण प्रवेशाचा निर्णय पचनी पडला पाहिजे, असंही ते म्हणाले.

पोस्टरवर झळकले

2019मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. त्यानंतर काँग्रेस हेडक्वॉर्टर बाहेर होर्डिंग्ज लागले होते. त्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह रॉबर्ट वाड्रा यांचेही फोटो होते. लोकसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वाड्रा यांचे पोस्टर लागले होते. त्यात त्यांना निवडणूक लढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याआधी 2016मध्ये लोकशाही बचाव मार्चच्या पोस्टरमध्येही वाड्रा यांचा राहुल यांच्यासोबत फोटो दिसला होता. त्यामुळे वाड्रा हे लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश घेण्याचे संकेत मिळत होते. (is Priyanka Gandhi Denying Robert Vadra’s Entry Into Politics And Why)

2012 मध्ये दिले होते संकेत

6 फेब्रुवारी 2012 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीत वाड्रा आले होते. त्यावेळी त्यांनी लोकांची इच्छा असेल तर मी राजकारणात यायला तयार आहे, असं म्हटंल होतं. तेव्हा वाड्रा यांचं विधान मीडियाने चुकीच्या पद्धतीने दाखवल्याची सारवासारव प्रियांका गांधी यांनी केली होती. त्यानंतर वाड्रा यांनीही सारवासारव करताना मी उद्योग व्यवसायातच बरा असं सांगत राजकारणात येणार नसल्याचं म्हटलं होतं. (is Priyanka Gandhi Denying Robert Vadra’s Entry Into Politics And Why)

संबंधित बातम्या:

काँग्रेससाठी पक्षपातीपणा करायला तयार होते प्रणवदा?

काँग्रेस भाजपमय होतेय? मुख्यमंत्री, मंत्री चक्क पक्षाच्या कामाला, वाचा सविस्तर

मी भारतातच आहे, पण देश सोडून पळालेत त्यांचं काय? रॉबर्ट वाड्रांचा सवाल

(is Priyanka Gandhi Denying Robert Vadra’s Entry Into Politics And Why)

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.