‘लाडली बहना योजने’तून वगळल्या महिलांची यादी जाहीर, तुमचं नाव आहे का? त्वरित तपासा!
Ladli behena yojana - लाडली बहना योजने’च्या माध्यमातून दर महिन्याला तुमच्या खात्यात येणारी रक्कम थांबणार तर नाही ना? काही महिलांची नावे यादीतून अचानक हटवण्यात आली आहेत! त्यामुळे तुमचं नाव सुरक्षित आहे की नाही, हे त्वरित तपासणं खूप गरजेचं आहे, अन्यथा योजनेचा लाभ गमावण्याची शक्यता आहे!

मध्य प्रदेशातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडली बहना योजना’ ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१२५० ची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र आता यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे काही लाभार्थी महिलांची नावं योजनेच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
राज्य सरकारने योजनेसाठी निश्चित केलेल्या अटी आणि पात्रतेच्या निकषांमध्ये ज्या महिलांची नावे बसत नाहीत, अशा महिलांना यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेषतः पडताळणीदरम्यान माहितीमध्ये विसंगती आढळल्यास, संबंधित महिलांचे नावे थेट यादीतून हटवले जात आहेत. त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे की नाही, हे एकदा तपासून घेणं फार गरजेचं आहे, अन्यथा दरमहा मिळणारी ₹१२५० ची रक्कम थांबू शकते.
आपलं नाव यादीत आहे की वगळलं गेलंय, हे घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर अगदी सहज तपासता येतं. त्यासाठी तुम्हाला फक्त मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना’ योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटचा पत्ता आहे: https://cmladlibahna.mp.gov.in/lbyapplicationstatus.aspx. या लिंकवर क्लिक केल्यावर अर्ज क्रमांक किंवा सदस्य समग्र आयडी टाकून तुमचं स्टेटस सहज पाहता येईल.
स्टेटस तपासताना सर्वप्रथम तुमचा अर्ज क्रमांक किंवा समग्र आयडी क्रमांक टाका. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा Captcha कोड अचूकपणे भरा. मग ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP योग्य जागी भरल्यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं नाव यादीत आहे की नाही, याची स्पष्ट माहिती दिसेल.
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी काही महत्वाच्या अटी आहेत. लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असणे आवश्यक आहे. वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावं आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा किंवा आयकर भरणारा नसावा.
यामुळे जर तुम्ही ‘लाडली बहना योजने’चा लाभ घेत असाल, तर तुमचं नाव यादीत आहे की नाही, हे एकदा तरी तपासणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा योजनेचा दरमहा मिळणारा निधी थांबण्याचा धोका संभवतो.