पाकच्या कुरापती वाढल्या, ISIकडून भारतीय फोन नंबरचा वापर, लष्कराची माहिती मिळवण्यासाठी भारतातील टोल नाक्यांवर फोन
लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याचीही विचारपूस करण्यात आली आहे. पंजाबमधील टोलनाक्यांना आयएसआयचे फोन आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भारतीय फोन नंबरचा वापर करून माहिती काढून घेण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या आयएसआयकडून भारतीय फोन नंबरचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारतातील टोलनाक्यांवर फोन करून लष्कराची माहिती घेतली जात आहे. लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याचीही विचारपूस करण्यात आली आहे. पंजाबमधील टोलनाक्यांना आयएसआयचे फोन आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भारतीय फोन नंबरचा वापर करून माहिती काढून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पाकिस्तानकडून ही नवी कुरापत काढण्यात आली आहे. पहलगाममधील हल्यानंतर भारातने कठोर पावलं उचलली, त्यानंतर पाकिस्तानकडून बॉर्डरवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे वातावरण आणखी धुमसलं. तर आता दुसऱ्या बाजूला त्यांनी ही वेगळी कार्यपद्धत अवलंबली आहे. आयएसआय या त्यांच्या संघटनेसह इतर संघटनांचे लोकं भारतामध्ये ही चौकशी करत आहेत.
गेल्या आठवड्यात पहलगाममधील बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉर्डवरूल सर्व राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आला होता, लष्करी हालचालीही वाढल्या. सध्या बॉर्डरच्या दिशेने जाणाऱ्या आर्मी किंवा एअरफोर्सच्या ज्या गाड्या आहेत, त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू आहे. त्यासाठी भारतीय मोबाईल क्रमांक वापरून टोल नाक्यांवर फोन करून माहिती विचारली जात आहे.
कुठे आला पहिला फोन ?
मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथील टोलनाक्यावर पहिला फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने आपण स्वत: लष्करी अधिकारी बोलत असल्याचा दावा करत लष्कराची किती वाहनं आत्तापर्यंत गेल्याचे विचारण्यात आले. मात्र तो पाकिस्तानमधून आल्याचे उघड झाले. जालंधरप्रमाणेच पठाणकोठ-अमृतसर रस्त्यावरील लाडपालवट टोल प्लाझा तिटोथेही काल दुपारी दीडच्या सुमारास फोन आला होता. एवढंच नव्हे तर चोलांगे टोल प्लाझा, हरसे मानसर टोल प्लाझा याठिकाणी देखील काल दुपारी 3.15 आणि 3.45 च्या सुमारास फोन आला होता आणि लष्कराच्या वाहनांबद्दल माहिती विचारण्यात आली होती.
यापुढे टोलप्लाझांवर जे फोन येतील त्याची माहिती लष्कराकडून घेतली जाणार आहे आणि पाकिस्तानपरयंत कोणतीही महत्वाची माहिती पोहोचू नये याची खबरदारीदेखील लष्कराकडून घेतली जाणार आहे.