इस्रायलने म्हटले हा दुसरा 9/11 हल्ला, हमासच्या दहशतवाद्यांना सोडणार नाही

Israel Ambassador on Hamas : इस्रायलचे भारतातील राजदूत यांनी टीव्ही ९ सोबतला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलची भूमिका स्पष्ट केली आहे. इस्रायल हमासला सो़डणार नाही. हमास मागे अदृश्य शक्ती असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी इराणवर देखील आरोप केले आहेत.

इस्रायलने म्हटले हा दुसरा 9/11 हल्ला, हमासच्या दहशतवाद्यांना सोडणार नाही
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 1:10 PM

Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात अजूनही संघर्ष सुरु आहे. इस्रायलने गाझा सीमा नियंत्रणात घेतली आहे. इस्रायलने या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नवीन रणनीती आखली आहे. इस्रायलला हमाससह आता हिजबुल्लाह आणि सीरिया यांच्या हल्ल्यांचा ही सामना करावा लागत आहे. या संघर्षात आतापर्यंत तीन हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. हमासच्या हल्ल्यात बाराशे इस्रायली नागरिकांचा मृत्यू झालाय. न्यूज 9 प्लसचे कार्यकारी संपादक आदित्य राज कौल यांना इस्रायलचे राजदूत नॉर गिलॉन यांची मुलाखत घेतली.

नॉर गिलॉन यांनी सांगितले की, हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलमध्ये अनेक हल्ले केले आहेत. यामुळे इस्रायलची संरक्षण यंत्रणा कोलमडली असल्याचा दावाही केला जात आहे. हमासच्या हल्ल्यामागे इराणचा हात आहे. यातून इराणचे हेतू आणि डावपेच उघड झाले आहेत.

हमासला हल्ल्यासाठी प्रवृत्त केले गेले

हमासच्या हल्ल्यांमागे इराणसोबत हिजबुल्लाचाही हात असू शकतो, असे गिलॉन यांनी म्हटले आहे. त्यांच्यामुळेच इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू असल्याचे ते म्हणाले. पीस पार्टीच्या हत्याकांडात सुमारे 260 लोक मारले गेले आहेत. हमासचे दहशतवादी हे महिलांवर बलात्कार करण्यासाठी, मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यासाठी ओळखले जातात, असेही गिलॉन यांनी सांगितले. ते दहशतवादी दक्षिण आशियाई, अमेरिकन आणि युरोपियन नागरिकांचे अपहरण करतात. ते मुलांची हत्या करतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात.

हमासला संपवण्यासाठी इस्रायल काय करत आहे?

नॉर गिलॉन यांनीही कबूल केले की, इस्रायली लष्कराची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसते. गाझा हमासच्या ताब्यात असल्याचे गिलॉन यांनी मान्य केले. त्यांनी इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन 9/11 चा आणखी एक हल्ला असे केले आहे. ते म्हणाले की, इस्रायल मध्य पूर्वेतील उदारमतवादी शक्तींची सेवा करत आहे जिथे इराण अस्थिरतेमागे आहे. ते म्हणाले की आयडीएफ (इस्रायल संरक्षण दल) दहशतवाद्यांचा सामना करत आहे. गाझावर आयडीएफचे हवाई हल्ले सुरूच आहेत.

भारत हे इस्रायली लोकांचे दुसरे घर

दरम्यान, नॉर गिलॉन यांनी अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा देण्याच्या घोषणेचे कौतुक केले. मात्र, सौदीच्या दुटप्पीपणावर त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, इस्रायल आणखी एका युद्धासाठी तयार आहे. भारताने दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांंनी आभार मानले.

इस्रायली लष्कर हमासची हल्ला करण्याची क्षमता संपवण्यासाठी पुढे सरसावले आहे. जगाला शांतता हवी आहे पण हमास इस्रायलवर पुन्हा हल्ला करणार नाही याची खात्री होईपर्यंत इस्रायलला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही हमासला चोख प्रत्युत्तर देऊ. असं ही ते म्हणाले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.