Israel Hamas War: भारताकडून नियम अधिक कडक, पाहता क्षणीच खाली पाडण्याचे आदेश

India action on hang gliders : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही सावध पवित्रा घेतला आहे. हमासने ज्या प्रकारे इस्रायलवर हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये ज्याप्रकारे घुसखोरी केली. त्यावरुन भारताने आता नियम अधिक कडक केले आहेत. काय आहेत हे नियम.

Israel Hamas War: भारताकडून नियम अधिक कडक, पाहता क्षणीच खाली पाडण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 8:45 PM

Israel-hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत ही आता सावध झाला आहे. भारत सरकारने हँग ग्लायडरच्या वापराबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. आता हँग ग्लायडर परवानगीशिवाय उडवले तर ते खाली पाडण्याचे आदेश देण्यात आले आहे.  इस्रायलवर हमासने ज्या प्रकारे हल्ला केला त्यानंतर भारत ही अलर्ट झाला आहे. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील डीजीसीएने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हँग ग्लायडिंगचे नियम आता आणखी कडक केले आहेत. भारतात हँग ग्लायडर उडवण्यासाठी DGCA ची परवानगी आवश्यक असेल. परवानगीशिवाय त्याची विक्री देखील करता येणार नाही. हँग ग्लायडर्स पायलटना सर्व निकष पूर्ण करावे लागतील आणि परवान्याच्या आवश्यकता देखील पूर्ण कराव्या लागतील.

DGCA ची परवानगी घ्यावी लागणार

नवीन नियमांनुसार, भारतीय आकाशात हँग ग्लायडर उडवण्यासाठी डीजीसीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनधिकृत हँग ग्लायडर फ्लाइटचे गंभीर परिणाम होतील. यात ग्लायडर खाली पडण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. खासगी हँग ग्लायडर विकण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. ग्लायडरच्या संभाव्य खरेदीदारांना आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मान्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जेणेकरून खरेदी करणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाईल.

हँग ग्लायडर पायलटसाठी कठोर सुरक्षा आवश्यकता देखील पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे हँग ग्लायडरला किमान ५० तास उडण्याचा अनुभव असावा. तसेच, ट्विन-इंजिन ग्लायडरसाठी, एखाद्याला किमान 10 तास उडण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. जे व्यावसायिक वैमानिक म्हणून काम करतील त्यांना किमान 25 तासांचा उड्डाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Photos: 'डल झील के ऊपर कलाबाजियां करते दिखे वायुसेना के एयरक्राफ्ट',  श्रीनगर में ऐसे मनाया जा रहा 'आजादी का अमृत महोत्सव' | Photos: 'IAF  aircraft seen doing ...

हँग ग्लायडर म्हणजे काय?

हँग ग्लायडर इंजिनशिवाय हलकी उडणारी मशीन म्हणून काम करतात. हे सहसा साध्या, त्रिकोणाच्या आकाराच्या पंखांवर विसावून हवेत उडतात. वर, खाली किंवा बाजूला जाण्यासाठी पायलट त्यावर नियंत्रण ठेवतो. हवेत उडतानाच हा थरार अनुभव असतो. लोक हे खूप मजेदार आणि साहसी छंद म्हणून याचा वापर करतात. आकाशातून डोंगराळ भाग आणि सुंदर नैसर्गिक ठिकाणे पाहण्याचा अनुभव याद्वारे घेता येतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.