Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hamas War | पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्राला विरोध, महात्मा गांधी यांचे विचार काय

Israel Hamas War | त्यावेळी ज्यूवर अत्याचार सुरु होते. हिटलरने तर अत्याचाराची सीमा ओलांडली होती. ज्यू लोकांविषयी महात्मा गांधी यांच्या मनात कळवळा होता. पण त्यांच्यासाठी पॅलेस्टाईन भागात स्वतंत्र ज्यू राष्ट्र निर्मितीला मात्र त्यांनी विरोध केला होता. त्यामागची कारणं काय होती? या प्रयोगाला त्यांनी का विरोध केला होता?

Israel Hamas War | पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्राला विरोध, महात्मा गांधी यांचे विचार काय
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 6:10 PM

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्र स्थापन करण्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विरोध होता. ज्यू राष्ट्र अस्तित्वात आले तेच मुळात युद्ध घेऊन. ज्यू सोबत अरब राष्ट्रांनी युद्ध छेडले. त्यात त्यांना अपयश आले. पण तेव्हापासून ज्यू विरोधात संघर्षाची ठिणगी कायम आहे. इतक्या दशकानंतर आता पुलाखालून वाहून गेल्यावर पण या संघर्षाला अंतच नसल्याचे समोर येत आहे. हमास या दहशतवादी संघटनेने अचानक केलेल्या हल्ल्याने मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे संकट (Israel Hamas War)ओढावले आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी का केला होता पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्र स्थापन करण्यास विरोध? काय होतं कारण?

काय होते विचार

‘जसे इंग्लंड हे इंग्रजांचे आहे, फ्रान्स हे फ्रेंच लोकांचे आहे, याच समान धाग्याने पॅलेस्टाईन हे अरबांचे आहे.’ असे महात्मा गांधी यांचे विचार होते. 26 नोव्हेंबर 1938 रोजीच्या हरिजन या दैनिकात त्यांनी हे विचार मांडले. ‘The Jews’ या मथळ्याखाली त्यांनी या प्रश्नावर एक विशेष लेख लिहिला होता. ज्यू लोकांविषयी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे मतप्रवाह आहे. ज्यू हा वादाचा विषय आहे. कोणाला त्यांचा भोळेपणा भावतो. तर काही जण त्यांच्या अहिंसेबद्दलची प्रतिबद्धता सांगतात, असे त्यांनी लेखात लिहिले आहे. गेल्या अनेक दशकांच्या पॅलेस्टाईन-इस्त्राईलमधील सातत्याने होणाऱ्या संघर्षाचा विचार करता गांधीजींना हा प्रश्न अत्यंत जटिल का वाटत होता, हे स्पष्ट होते.

हे सुद्धा वाचा

त्यांच्याविषयी सहानभूती

जगभरातील ज्यू अत्याचार सहन करत आहेत. त्यांच्याविषयी आपल्या मनात सहानभूती असल्याचे त्यांनी लेखात म्हटले आहे. ख्रिश्चन त्यांना अस्पृश्य मानतात. हिंदूमधील अस्पृश्यता अशीच असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू आणि ख्रिश्चनांनी ही अस्पृश्यता धार्मिक अंगाने स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

का केला विरोध

या लेखात गांधीजींनी पॅलेस्टाईन भूमीत ज्यू राष्ट्र का नाकारले ते स्पष्ट केले आहे. ज्यूंना अरबांवर लादणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. अरबांचा आत्मसन्मान दुखावणे हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये अंशतः अथवा राष्ट्र म्हणून ज्यू लोकांना वसवणे हा मानवतेविरुद्धचा गुन्हा ठरेल, असे त्यांनी लिहिले. अरबांच्या सद्भवनेच्या जोरावरच ज्यू पॅलेस्टाईनमध्ये राहू शकतात. पण त्यासाठी ब्रिटिशांच्या बंदुकीची गरज नसल्याचे परखड विचार त्यांनी मांडले होते.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.