Aditya L1 Mission: आदित्य एल-1 लॉन्चिंग अवघ्या काही तासांवर, जाणून घ्या कशी असेल संपूर्ण प्रोसेस

Aditya L1 Mission: चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर शोध मोहीम सुरु झाली आहे. असं असताना सूर्याच्या अभ्यासाठी आदित्य एल-1 झेपावणार आहे. या मोहीमेत नेमकं काय असणार आहे ते जाणून घ्या

Aditya L1 Mission: आदित्य एल-1 लॉन्चिंग अवघ्या काही तासांवर, जाणून घ्या कशी असेल संपूर्ण प्रोसेस
Aditya L1 Mission: आदित्य एल-1 मिशनसाठी इस्रोची तयारी पूर्ण, अवघ्या काही तासात घेणार झेप; संपूर्ण मोहिमेबाबत जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 3:41 PM

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं संशोधनासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. चंद्रयान 3 मोहीम सुरु असताना इस्रोनं सूर्याच्या अभ्यासासाठी मोहीम हाती घेतली आहे. आदित्य एल 1 सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी श्रीहरिकोटा स्पेस सेंटरवरून 2 सप्टेंबरला झेपावणार आहे. यासाठी लॉन्चिंगची पूर्वतयारी आणि मोहिमेशी निगडीत सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात आली आहे. आदित्य एल-1 हे पीएसएलव्ही एक्सएल सी57 च्या माध्यमातून अवकाशात झेपावणार आहे. हे स्वदेशी रॉकेट आदित्य एल-1 पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये पोहोचवण्यास मदत करेल. त्यानंतर आदित्य एल-1 पुढचा प्रवास करत थेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईल. त्यानंतर आदित्य एल-1 सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यानंत असलेल्या एल-पॉइंटवर आपलं ठाण मांडेल. या संपूर्ण प्रवासाला 4 महिन्यांचा अवधी लागेल. म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी प्रवासासाठी निघालेलं आदित्य एल-1  जानेवारी 2024 पर्यंत निश्चित ठिकाणी पोहोचेल.

काय म्हणाले इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ?

आदित्य एल-1 मोहीमेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.50 मिनिटांनी यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. आदित्य एल-1 च्या मदतीने सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्यापासून निघणारी किरणांचा अभ्यास केला जाईल. आदित्य एल-1 सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या लॅरेंज प्वाइंट-1 पर्यंत जाईल. हा प्वाइंट पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किमी दूर आहे.

आदित्य एल-1 मोहिमेतून काय अभ्यास केला जाणार?

आदित्य एल-1 असलेल्या 7 पेलोड्स सूर्यापासून निघणाऱ्या विविध किरणांचा अभ्यास करेल. तसेच सूर्यापासून येणारी उष्णता आणि गरम हवेचा अभ्यास करणार आहे. यामुळे सौर वायुमंडळबाबत जाणून घेता येणार आहे. यामुळे सूर्यावरील घडामोडींचा पृथ्वीतलावर कसा परिणाम होतो याची माहिती मिळणार आहे.

जर वेगावर नियंत्रण ठेवलं नाही तर आदित्य एल-1 जळून खाक होईल

चंद्रयान मिशनप्रमाणे आदित्य एल1 मोहिमेत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएसएलव्ही एक्सएल सी57 पृथ्वीच्या एका कक्षेत सोडेल. पण त्यानंतर पृथ्वीच्या स्पेयर ऑफ इंफ्लूएंसच्या बाहेर जाणं मोठं आव्हान असणार आहे. कारण गुरुत्वाकर्षमामुळे पृथ्वी प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. त्यानंतर क्रूज फेज आणि हॅलो फेजमध्ये वेगावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर यान थेट सूर्याच्या दिशेने जाईल आणि जळून खाक होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.