ISRO | मंगळ, चंद्र आणि सुर्यानंतर आता इस्रोची नजर शुक्रावर
शुक्र ग्रहाचा प्राथमिक अभ्यास केला असता तेथे जीवन का नाही ? याचा उलगडा होतो. त्याचा अजूनही सखोल अभ्यास करण्यासाठी इस्रोने तेथे मोहीम आखण्याची तयारी केली आहे.
नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : भारताची चंद्रयान-3 मोहीम प्रचंड यशस्वी झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ( ISRO ) प्रमुख डॉ. एस.सोमनाथ यांनी आता शुक्र ग्रहाचा ( Venus ) अभ्यास करण्याचा संकल्प सोडला आहे. शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आहे. शुक्र ग्रहावर वातावरणाचा दबाव पृथ्वीच्या 100 पट जास्त आहे. डॉ. एस. सोमनाथ इंडीयन नॅशनल सायन्स अकादमी ( INSA ) येथे लेक्चर देत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
शुक्र ग्रहाची अनेक रहस्य अद्याप मानवाला माहिती नाहीत. शुक्रावर वातावरणाचा इतका दबाव आहे, याचा अभ्यास करायचा आहे. शुक्रावर सभोवताली ढगांचे आवरण असून त्यात एसिड भरलेले आहे. त्यामुळे कोणतेही स्पेसक्राफ्ट त्याचे वातावरणाचा थर भेदून आत जाऊ शकत नाही. शुक्र ग्रहाच्या निर्मितीबाबत माहीती मिळविण्यासाठी त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
‘शुक्रयान मोहीमे’ला उशीर होणार ?
शुक्र आणि मंगळ ग्रहाचा अभ्यास केला असता तेथे जीवन का नाही ? याचा उलगडा होतो. त्याचा अजूनही सखोल अभ्यास करण्यासाठी तेथे मोहीम आखण्याची गरज आहे. सोमनाथ यांच्या या वक्तव्यापूर्वी इस्रोच्या एका संशोधकाने दावा केला होता की ‘शुक्रयान मोहीमे’ला उशीर होऊ शकतो. यासंदर्भात इस्रोची शुक्रावर जाण्याची तयारी तर पूर्ण आहे. परंतू सरकारच्या वतीने अद्याप या मोहिमेसाठी अधिकृत परवानगी दिलेली नाही. या संदर्भात एका संशोधकाने म्हटले होते की जर वेळेत परवानगी मिळाली नाही तर पुढच्या वर्षी 2024 हे शुक्रयान मिशन लॉंच होऊ शकणार नाही. जर पुढच्या वर्षांनंतर सर्वात चांगली संधी सात वर्षांनंतर म्हणजे 2031 साली मिळेल. शुक्रयान ही शुक्र ग्रहावरील देशाची पहिली मोहीम आहे.
18 पेलोडचा असणार समावेश
शुक्रयान एक ऑर्बिटर मिशन आहे. हे यान शुक्राच्या चारी बाजूनी फिरुन अभ्यास करणार आहे. यात 18 अभ्यास उपकरणे ( पेलोड ) असणार आहेत. हाय रिझोल्यूशन सिंथेटीक अपर्चर रडार आणि ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार हा दोन उपकरणे खास असणार आहेत. शुक्रयान अंतराळातून शुक्राची भौगोलिक रचना आणि ज्वालामुखींच्या घडामोडीचा अभ्सास करणार आहे. जमिनीतून बाहेर येणारे गॅस उत्सर्जनस, हवेची गती, ढगांचे आवरण आणि इतर बाबींचा अभ्यास होणार आहे. यानाचे वजन 2500 किमी असणार आहे. त्यात जर्मनी, स्वीडन, फ्रान्स आणि रशियाचे देखील पेलोड असणार असून GSLV Mark II रॉकेटद्वारा शुक्रयानाला लॉंच केले जाणार आहे.