राम मंदिर निर्माणमध्ये ISRO अन् IIT चा सहभाग, लोखंडाचा वापर न करता का उभारले मंदिर

Ram Mandir | राम मंदिरच्या निर्मिती करताना अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु प्रत्येक अडचणीत मार्ग निघत गेला. त्यानंतर हजार वर्षांपर्यंत टिकणारे भव्यदिव्य राम मंदिर तयार झाले. या मंदिरासाठी भारतीय अंतराळ संस्था आणि आयआयटीची मदत मिळली.

राम मंदिर निर्माणमध्ये ISRO अन् IIT चा सहभाग, लोखंडाचा वापर न करता का उभारले मंदिर
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 3:45 PM

अयोध्या, दि.20 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या मंदिराच्या आकर्षक वास्तू रचनेकडे जगाचे लक्ष लागले आहे. मंदिराची निर्मिती करताना अनेक नवीन प्रयोग प्रथमच करण्यात आले होते. त्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक आणि आयआयटीच्या अभियंत्यांची मदत घेतली गेली आहे. आधुनिक विज्ञान आणि पारंपारिक वास्तुकला यांच्या मिश्रणातून सर्वात सुंदर राम मंदिराची उभारणी झाली आहे. राम मंदिरास एक हजार वर्षांपर्यंत काहीच होणार नाही, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.

प्रथमच मंदिराच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञांचा सहभाग

मंदिराचा आरखडा तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी असे कधीच झाले नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि इंडियन इंस्ट्रट्यूट ऑफ टेक्नॉलाजी (आयआयटी) मधील अभियंत्यांची मदत झाली. चंद्रकांत सोमपुरा यांनी नागर शैलीत या मंदिराचे डिझाइन तयार केले आहे. सोमपुरा परिवार जवळपास पंधरा पिढ्यांपासून हे काम करत आहेत. या परिवाराने देशभरातील शंभरपेक्षा जास्त मंदिरांचे डिझाइन तयार केले आहेत. सोमपुरा म्हणतात, ‘वास्तुकलेच्या इतिहासात राम मंदिर सर्वश्रेष्ठ आहे. पृथ्वीवर इतक शानदार रचना यापूर्वी झाली नाही.’

लोखंडाचा वापर का केला नाही

मंदिर 2.7 एकरमध्ये तयार करण्यात आले आहे. 57,000 वर्ग फूट असलेले हे मंदिर तीन मजली आहे. त्यासाठी कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आला नाही. कारण लोखंडाचे वय फक्त 80-90 असते. तसेच सिमेंट किंवा चुन्याचा वापर नाही. ग्रेनाइट, बलुआ दगड आणि संगमरमरचा वापर केला आहे.

हे सुद्धा वाचा

अडचणींवर मात

मंदिराच्या खाली असलेली जमीन वाळू असलेली होती. तसेच एका ठिकाणी सरयू नदी मंदिराच्या ठिकाणाजवळून वाहत होती. यामुळे आणखी मोठे आव्हान होते. या समस्येवर शास्त्रज्ञांनी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. प्रथम मंदिराच्या संपूर्ण परिसराची माती 15 मीटर खोलीपर्यंत खणण्यात आली. या भागात 12-14 मीटर खोलीपर्यंत इंजिनीअरकडून तयार करण्यात आलेली माती टाकण्यात आली होती. कोणत्याही स्टीलचा वापर करण्यात आला नाही. ते घन खडकासारखे दिसण्यासाठी पायाचे 47 थर कॉम्पॅक्ट केले गेले.

हे ही वाचा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूर्वी मोठी चूक, ट्रस्टकडून कठोर कारवाईची तयारी

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.