Chandrayaan 3: इस्त्रोच्या चंद्रयान- 3 ची कमाल, मिळवले मोठे यश, प्रग्यान रोवरने केले महत्वाचे संशोधन

Chandrayaan 3: चंद्रयान-3 चा विक्रम लँडमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने चंद्राच्या पुष्ठभागावरील जवळपास 103 मीटर आंतर कापले आहे. रोवर मॅन्जिनस आणि बोगुस्लावस्की क्रेटर दरम्यान चालला. या संपूर्ण भागाबाबत जगभरातील वैज्ञानिकांमध्ये कुतूहल आहे.

Chandrayaan 3: इस्त्रोच्या चंद्रयान- 3 ची कमाल, मिळवले मोठे यश,  प्रग्यान रोवरने केले महत्वाचे संशोधन
Chandrayaan 3
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 9:01 AM

भारताचा तिसरे मून मिशन चंद्रयान-3 ला मागील वर्षी मोठे यश मिळाले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) चंद्रयान-3 ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत इतिहास निर्माण केला होता. द्रक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश ठरला होता. आचा चंद्रयान-3 संदर्भात नवीन माहिती मिळाली आहे. त्यामुळे चंद्र जवळून समजून घेण्यास शास्त्रज्ञांना खूप मदत होणार आहे. चंद्रयानच्या प्रग्यान रोवरने शिवशक्ती प्वाइंटजवळ महत्वाचे संशोधन केले आहे. हे संशोधन चंद्राची निर्मिती आणि त्या ठिकाणी जमीन, खडकांचे तुडके यासंदर्भातील आहे.

लहान खडकांचे तुकडे मिळाले

इंडिया टुडेनुसार, चंद्रयान-3 चा विक्रम लँडमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने चंद्राच्या पुष्ठभागावरील जवळपास 103 मीटर आंतर कापले आहे. रोवर मॅन्जिनस आणि बोगुस्लावस्की क्रेटर दरम्यान चालला. या संपूर्ण भागाबाबत जगभरातील वैज्ञानिकांमध्ये कुतूहल आहे. चंद्रयान-3 ज्या ठिकाणी लँड झाला होता, त्या जागेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिव प्वाइंट नाव दिले आहे. या ठिकाणी प्रग्यानला लहान खडकांचे तुकडे मिळाले, ज्यांची लांबी एक सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर आहे. खडकाचे हे तुकडे लहान खड्ड्यांच्या कडा, उतार विखुरलेले आढळले. यापैकी एकाही खडकाचा व्यास दोन मीटरपेक्षा जास्त नाही.

प्रग्यानची शिवशक्ती प्वाइंटच्या पुढे वाटचाल

चंद्रासंदर्भात यावर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या माहितीचे सादरीकरण इंटरनॅशनल कॉन्फ्रेंस ऑन प्लेनेट्स, एक्सप्लोनेंट्स एंड हॅबीटॅलिटीमध्ये करण्यात आले होते. शास्त्रज्ञांना चंद्रयान-3 च्या संशोधनातून वेगवेगळी माहिती मिळत आहे. प्रग्यान रोवर शिवशक्ती प्वाइंटच्या 39 मीटर पुढे गेला आहे. त्या ठिकाणी त्याला जे खडक मिळाले आहे, त्याचा आकारही खूप मोठा आहे.

शिवशक्ती पॉइंटच्या पश्चिमेला सुमारे दहा मीटर व्यासाचा खड्डा आहे. हा खड्डा या ठिकाणी असलेल्या खडकांचा उगम असू शकतो. यामुळे आजूबाजूच्या भागात खडकांचे पुनर्वितरण झाले असेल किंवा कालांतराने ते तिथेच गाडले गेले. ते खडक प्रग्यान पुन्हा सापडले.

इस्त्रोकडून नवीन योजनेची तयारी

चांद्रयान-३ मोहिमेत इस्त्रोला मोठे यश मिळाले. त्यानंतर इस्रो आता एका नव्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, भारताने पुढील चंद्रयान मिशन चंद्रयान-4 ची अंतिम योजना तयार केली आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे स्पेस डॉकिंग स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) समाविष्ट आहे. ही योजना आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.