Chandrayaan-3 on Moon |…तर चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या बाबतीत ‘तो’ चमत्कार ठरेल
Chandrayaan-3 on Moon | हा चमत्कार काय असेल?. रोव्हरच्या माध्यमातून मिळणाऱ्या डाटाच इस्रोचे वैज्ञानिक विश्लेषण करतील. प्रज्ञान चांद्रभूमीवर 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहे.
बंगळुरु : चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं काम सुरु केलं आहे. लँडिंगनंतर काही तासांनी ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरमधून बाहेर आला व त्याने आपलं संशोधन कार्य सुरु केलं. ‘प्रज्ञान’ ही सहाचाकांची रोबोटिक गाडी आहे. चंद्रावर ही गाडी फिरणार आहे. फोटो काढणार आहे. ‘प्रज्ञान’ गाडीवर इस्रोचा लोगो आणि तिरंगा झेंडा आहे. रोव्हरच्या माध्यमातून मिळणाऱ्या डाटाच इस्रोचे वैज्ञानिक विश्लेषण करतील. प्रज्ञान चांद्रभूमीवर 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहे. कॅमेऱ्याच्या मदतीने चंद्रावरील वस्तुच स्कॅनिंग करणार.
चंद्रावर कसं वातावरण आहे? त्याचा सुद्धा अभ्यास करणार. रोव्हरमध्ये तशा पद्धतीचे पेलोड बसवण्यात आले आहेत. त्यातून चंद्राच्या पुष्ठभागाबद्दल अधिक चांगली माहिती मिळेल. रोव्हरकडून चंद्रावरील IONS आणि इलेक्ट्रॉन्सच्या मात्रेबद्दल सुद्धा माहिती मिळेल.
वैज्ञानिकांच मत काय?
पृथ्वीरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा 1 दिवस असतो. तिथे 14 दिवस सूर्यप्रकाश आणि 14 दिवस रात्र असते. ‘प्रज्ञान’ रोव्हरची निर्मिती एक लुनार डे म्हणजे 14 दिवसांच्या हिशोबाने करण्यात आली आहे. विक्रम लँडर आणि रोव्हर पुन्हा रिचार्ज होण्याची शक्यता फारच कमी आहे. . विक्रम लँडर आणि रोव्हर एक अतिरिक्त लुनार डे पर्यंत काम करु शकतात, असं वैज्ञानिकांच मत आहे. …तर, तो चमत्कार ठरेल
चंद्रावर रात्री प्रचंड थंडावा असतो. तिथे -200 मध्ये तापमान असतं. अशा वातावरणात ही उपकरणं गोठून जातील. त्यामुळे चंद्रावर पुन्हा दिवस झाल्यानंतर ही उपकरण चालण्याची शक्यता फार कमी आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच सौर ऊर्जेवर काम चालू आहे. आता तिथे दिवस आहे. रात्र होऊन पुन्हा दिवस झाल्यानंतर ही उपकरण कार्यरत राहिली, तर ते कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नसेल.