Chandrayaan-3 Update | वाह क्या बात है… विक्रम लँडरचे रंगीत फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल; घ्या थेट चंद्रावरील सफरीचा अनुभव
इस्रोने विक्रम लँडरचे रंगीत फोटो जारी केले आहेत. तसेच हे फोटो थ्रीडी चष्म्यानेच पाहण्याचे आवाहन केले आहे. हे फोटो एकदा पाहाच. एकदम विहंगम दृष्य दिसतं. आपण चंद्रावरच आहोत की काय असा भास होतो. त्यामुळे हे फोटो पाहणे विसरू नका.
नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यापासून चंद्रासंदर्भातील नवनवीन माहिती मिळू लागली आहे. आता तर इस्रोने चांद्रयान -3 च्या विक्रम लँडरचे थ्रीडी फोटो जारी केले आहेत. हे फोटो पाहायचे असेल तर थ्रीडी चष्मे घालून पाहा. तरच हे फोटो पाहण्याची खरी मजा येईल, असं इस्रोने म्हटलं आहे. रेड आणि सयान थ्रीडी ग्लासने हे फोटो पाहण्याचा सल्ला दिला आहे. प्रज्ञान रोव्हरने काही दिवसांपूर्वी लँडरच्या 15 मीटर अतंरावर म्हणजे 40 फूट अंतरावरून हे फोटो क्लिक केले होते. ते इस्रोने आता जारी केले आहेत.
इस्रोने विक्रम लँडरच्या आजपासच्या जागेच्या डायमेंशनला स्टिरिओय आणि मल्टि व्ह्यू इमेज म्हणून जारी केले आहे. याला इस्रो एनगलिफ म्हणत आहे. हे फोटो प्रज्ञान रोव्हरच्या नॅवकॅमने घेतले आहेत. त्यानंतर नॅवकॅमचं रुपांतर स्टिरिओमध्ये करण्यात आलं. हे 3 चॅनलवाले फोटो आहेत. खरे तर दोन फोटोंचं हे मिश्रण आहे. एक फोटो रेड चॅलनवर होता. तर दुसरा ब्ल्यू आणि ग्रीन चॅनलवर होता. दोन्हींना मिळून हे फोटो तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे बघणाऱ्यांना विक्रम लँडर थ्रीडी इमेजमध्ये दिसतोय. म्हणजे चंद्रावर उभं राहूनच आपण विक्रम लँडर पाहतोय की काय असा भास होतो.
सर्वात आधी सोलार दिसेल
हे फोटो घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने पाहिले तर आपल्या सर्वात आधी सोलर पॅनल दिसते. म्हणजे सूर्याच्या उष्णतेची ऊर्जा घेऊन तो रोव्हरला देतो. त्याच्या खाली सोलर पॅनल हिंज दिसतो. म्हणजे सोलर पॅनल रोव्हरला कनेक्ट झालेला दिसतो. त्यानंतर नॅव कॅमेऱ्याचा नेव्हिगेशन कॅमेरा दिसतो. यामुळे रस्ता दिसण्याची आणि चालण्याची दिशा दिसण्यास मदत होते.
असा आहे रोव्हर
याचा चेसिसही दिसत आहे. सोलर पॅनलच्या खाली त्याचा धरून ठेवणारा सोलर पॅनल होड्ल डाऊन आहे. तर खाली सहा व्हिल ड्राईव्ह असेंबली आहे. म्हणजेच चाके लागलेली आहेत. त्याशिवाय रॉकर बोगीही आहे. त्याच्यामुळे ओबधधोबड रस्त्यावरून चालण्यास मदत होते. त्याशिवाय रोव्हरच्या खालच्या भागात रोव्हर होल्ड डाऊन लावलेला आहे. जेव्हा रोव्हर चालू नसेल तेव्हा तो जमिनीवर एका जागी स्थिर असेल. म्हणजे नंतर त्याला पाहिजे तेव्हा उचलता येऊ शकेल, अशी त्यात व्यवस्था करण्यात आली आहे.
रोव्हरचा आकार कसा?
चांद्रयान -3 रोव्हरचे एकूण वजन 26 किलो आहे. हा रोव्हर तीन फूट लांब आहे. अडीच फूट रुंद आणि 2.8 फूट उंच आहे. रोव्हरला सहा पाय आहेत. हो रोव्हर कमीत कमी 500 मीटर म्हणजे 1600 फूट चंद्राच्या गोलार्धावर जाऊ शकतो. त्याची स्पीड 1 सेंटीमीटर प्रति सेकंद आहे. पुढचे 13 दिवस तो चंद्राच्या गोलार्धावर काम करेल. त्याला सूर्याच्या किरणांपासून ऊर्जा मिळत राहील.