जोशीमठमध्ये तीन कोटींचे घर तोडले, सरकारी मदत पाच हजार

लोक आपली करोडोंची घरे उद्ध्वस्त होताना बघत आहेत. आतापर्यंत काही मोजक्याच लोकांना मदतीच्या नावाखाली सरकारकडून पाच हजार रुपयांचा धनादेश मिळाला आहे.

जोशीमठमध्ये तीन कोटींचे घर तोडले, सरकारी मदत पाच हजार
जोशीमठमध्ये घरांना तडे गेली आहे. Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 4:17 PM

जोशीमठ : उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath Sinking) भूस्खलन होत आहे. यामुळे बद्रीनाथ धामच्या (Badrinath Dham) मुख्य मार्गावरील अडचणी दिवसांदिवस वाढल्या आहेत. अवघ्या १२ दिवसांत ५.६ सेमीने जोशीमठ गाव धसले आहे. ISROने सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून हा खुलासा केला गेला आहे. २७ डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान शहर ५.४ सेमी धसले आहे. याआधीही एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जोशीमठ ९ सेंटीमीटरने धसले होते. जोशीमठमध्ये जमिनी व घरांना तडा जाऊ लागल्या आहेत. यामुळे सरकारने सर्वच नागरिकांचे स्थालांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. जोशीमठमध्ये पाऊस सुरु आहे. यामुळे ही घरे कोसळण्याचा धोका वाढला आहे. लोक आपली करोडोंची घरे उद्ध्वस्त होताना बघत आहेत. आतापर्यंत काही मोजक्याच लोकांना मदतीच्या नावाखाली सरकारकडून पाच हजार रुपयांचा धनादेश मिळाला आहे. एका स्थानिक नागरिकाचे तीन कोटींचे घर तोडले गेले आहे. त्यालाही सध्या पाच हजाराची मदत मिळालीय.

कुठे आहे जोशीमठ : उत्तराखंडच्या गढवालमधील पैनखंडा परगण्यात समुद्रसपाटीपासून ६१०७ फूट उंचीवर जोशीमठ आहे. धौली आणि विष्णूगंगेच्या संगमापासून अर्धा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अलकनंदा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जोशीमठची लोकसंख्या १८७२ मध्ये केवळ ४५५ होती. ती १८८१ मध्ये वाढून ५७२ झाली होती. परंतु 2011 च्या जनगणनेनुसार जोशीमठची लोकसंख्या १७ हजारांवर गेली. जोशीमठमध्ये सैन्याच्या तुकड्या आहेत. या सर्व गटांच्या तुकड्यांमधील आकडा मोजता हा एकूण आकडा साधारणपणे ५० हजारांच्या जवळपास जातो.

काय आहे महत्व :

हे सुद्धा वाचा

जोशीमठाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. आधुनिक हिंदु धर्माचे सर्वांत महान धर्मगुरु आदि शंकराचार्य यांनी याठिकाणी एका झाडाखाली साधना केली. त्याच ठिकाणी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त केलं होतं. त्यामुळंच याला ज्योतिर्धाम म्हटलं गेलं.

चार धाम किंवा छोटा चार धाम म्हणजे काय :

छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्माच्या हिमालय पर्वतरांगांपैकी एक पवित्र मंदिर आहे. हे उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यात वसलेले आहे आणि या मार्गावर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री असे चार धाम आहेत. यापैकी बद्रीनाथ धाम ही भारताच्या चार धामपैकी सर्वात उत्तरी आहे. या चारही ठिकाणांची स्वतःची खासियत असली तरी चारधामच्या रूपाने ते एक युनिट म्हणून पाहिले जातात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.